आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वतःचे एटीएम कार्डमधून पैसे काढणार. याची खबर बँकेला नसायची. पैसे मात्र यांना मिळणार अशा वेगळ्या पद्धतीने पैसे काढून घेणाऱ्या तिघा संशयित आरोपींना फौजदार चावडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. तिघेजण हरियाणा राज्यातील आरोपी आहेत. चोरटे सोलापूरपासून दहा-बारा किलोमीटरवर लांब असलेल्या लॉजवर मुक्काम करत. रात्री बारा-साडेबाराला रूम घ्यायचे व पहाटे पाचला सोडून जायचे. परिसरातील ५०-६० लॉजिंगची तपासणी पोलिसांनी केली. सीसीटीव्ही फुटेजचा आधार मिळाला.
तांत्रिक बाबींच्या मुद्द्याच्या आधारे त्यांना दोन दिवसांपूर्वी तिघेजण पोलिसांच्या जाळ्यात आले आहेत. स्वतःच्याच एटीएम कार्डने पैसे काढायचे, मात्र त्यांच्या खात्यात पैसे तसेच शिल्लक राहत. जेव्हा पैसे डेबिट होतात, तेव्हा त्याचा मेन पॉवर स्विच केल्यामुळे संबंधित व्यक्तीच्या खात्यातून पैसे डेबिट होत नव्हते, अशा वेगळ्या पद्धतीने ही चोरी ते करत होते. सोलापुरात दोन -तीन दिवसांमध्ये पाच बँकांनी फिर्याद दिली होती.
पाच एटीएममधून सुमारे आठ लाख चोरले हिताची पेमेंट सर्व्हिसेस कंपनीच्या वेगवेगळ्या भागातील पाच एटीएममधून या चोरांनी सुमारे आठ लाख रुपये दोन महिन्याच्या अंतराने काढून घेतले. यासाठी साता-आठ एटीएम कार्ड वापरले होते. याची फिर्याद कंपीनीचे किरण लांडगे यांनी दिली होती. एटीएममधून पैसे कमी होत होते. मात्र कोणाच्याही खात्यातून ते कमी होत नव्हते.
वीजच गुल करायचे गर्दी नसलेल्या एटीएममध्ये जात. त्यांच्या खात्यात जर पन्नास हजार रुपये असतील तर चाळीस हजार रुपये ते काढत. नोटा बाहेर येत असताना वीजपुरवठा बंद करण्याचे त्यांच्याकडे तंत्र होते. पैसे आल्यानंतर वीज सुरू करणार. त्यामुळे कोणाच्या खात्यातून पैसे गेले हे बँकेलाही कळत नव्हते. ४८ तासानंतर एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या एजन्सीला मात्र हा पैशाचा फरक दिसत होता अशा पद्धतीने ही टोळी पैसे काढण्यात तरबेज असल्याचे पोलिस निरीक्षक विकास देशमुख यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.