आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराची तहान भागवण्यासाठी प्रमुख तीन जलस्रोत आहेत. यापैकी हिप्परगा तलावात दोन वर्षांपूर्वी अत्यल्प पाणी होते, तरीही शहरात तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा सुरळीत होत होता. आता हिप्परगा तलावात ८० टक्के जलसाठा आहे. तेथून रोज १९ दशलक्ष लिटर पाणी भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रात येते. तरीही शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत आहे. चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची २५ दिवसांची पालिकेने दिलेली मुदत संपली तरी पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही.
सलगर वस्ती भागात पाण्यावाचून हाल होत आहेत. या प्रश्नावर माजी नगरसेवक किसन जाधव यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. हिप्परगा तलावापासून कालवा गायब हिप्परगा तलावापासून शहरात कालव्याने पाणी येत होते. रूपाभवानी मंदिर परिसरात आजही कालवा आहे पण तलाव परिसरातील कालवा गायब झाला आहे. भोगाव कचरा डेपो येथे मागील वर्षी आग लागल्यावर हिप्परगा कालव्यातून पाणी घेऊन आग शमवली होती. तेथून पुढील भागातील कालवा गायब आहे. सिंचन विभाग त्यावर बोलण्यास तयार नाही.
हिप्परगा तलावातून यापूर्वी पाणी येत नव्हते, त्यावेळी उजनी व टाकळी जलवाहिनीवरून येणाऱ्या पाण्यातून शहराची तहान भागत होती. आता हिप्परगासह उजनी व टाकळी येथून पूर्ण क्षमतेने पाणी येत असतानाही शहरात पाण्यावरून ओरड सुरू आहे. वितरण व्यवस्थेत अडचणी असल्याचे दिसून येते. यामुळे भवानी पेठ, शाहरी वस्ती, शेळगी त पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला.
पालिकेसमोर आंदोलन करू महापालिकेने पाणीपुरवठा सुरळीत करावी, अन्यथा पुढील काळात नागरिकांना घेऊन पालिकेसमोर आंदोलन करावे लागेल. किसन जाधव, माजी नगरसेवक
हिप्परगा जलवाहिनीची रात्री उशिरापर्यंत दुरुस्ती हिप्परगा जलवाहिनीस पर्ल गार्डनजवळ गळती सुरू असल्याने शेळगी नाल्यात पाणी वाया जात आहे. पाच दिवस झाले तरी दुरुस्ती नाही. याबाबत पालिका अधिकारी नीलकंठ मठपती यांना विचारले असता, मंगळवारी रात्री दुरुस्ती करण्यात आल्याचे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.