आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:समाजातील प्रत्येक घटक; अनुभव हेच खरे शिक्षक

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षणावर आपले आयुष्य अवलंबून आहे. आजच्या जगात शाळेत व महाविद्यालयात शिकवणारे गुरू हेच फक्त आपले शिक्षक नसून समाजातील प्रत्येक घटक व अनुभव हे सुद्धा आपले शिक्षक आहेत, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांनी केले.

लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून शिक्षक दिन साजरा झाला. तीत श्री. शिंदे मार्गदर्शन करीत होते. समन्वयन महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले. सूत्रसंचालन राजश्री जगदाळे हिने केले. प्रास्ताविक दुर्गा देशमुख हिने केले. महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांना सन्मानित करण्यात आले. विद्यार्थिनी आरती खुने, ओंकार कदम, नेहा, आदित्य कदम, वैभव फुगटे यांनी मनोगतातून शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थी शंकर मोटे याने आभार मानले. प्रा. सागर महाजन, प्रा. डॉ. तथागत वाघमारे, प्रा. पूनम उंबरे, प्रा. डॉ. रश्मी हेगडे, प्रा. प्रदीप आदलिंगे, प्रा. अमर कदम, प्रा. आशिष सरकाळे, प्रा. एन. खुने, सचिन डोईजोडे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...