आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीला जाणारा वारकरी हिंदू धर्माचे भूषण:वारकरी संप्रदाय हा प्रवाह, त्याचे संवर्धन करणे हे आपले कामच - देगलूरकर महाराज

सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक वारकरी जो पंढरीला जातो तो वारकरी संप्रदायाचा भूषण आहे. तो संपूर्ण हिंदू धर्माचा भूषण आहे. त्यात कुणी एकटे भूषण होऊ शकत नाहीत. हा प्रवाह आहे. त्याचे जतन संवर्धन करणे हे कार्य आपण करत आहोत. हीच परंपरा जपत आहोत, असे मत प्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानेश्वरी अभ्यासक चैतन्य महाराज देगलूरकर यांनी व्यक्त केले. श्री संत साहित्य सेवा संघ सोलापूरच्या वतीने संस्थेचे संस्थापक ज्ञानेश्वरीचे थोर उपासक वै. द.का. तथा भाऊ थावरे यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त चैतन्य महाराज देगलूरकर आणि डॉ. अरुण प्रभुणे या दोघांचा विशेष सन्मान देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या विश्वस्त डॉ. स्वर्णलता भिशीकर, डॉ. अरुण प्रभुणे, विश्वासराव जतकर, अविनाश जोग, गणेश थावरे, सविता पोफळे, डॉ. माधवी रायते. संजीव कुसुरकर प्रमोद कामतकर हे उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, काही पुरस्कार हे ईश्वर पूजनाच्या स्वरुप असतात. तर काही जबाबदारी आणि आशीर्वाद असतो. त्यातील हा एक पुरस्कार आहे. अभ्यास आणि पारायण उपासना हे सगळे समजावून सांगण्याचे काम त्यांनी केले. ते आदर्श उदाहरण म्हणजे भाऊ आहेत. त्यांचे वर्णन कसे करावे कळत नाही.

चैतन्य देगलूरकर महाराज यांना 51 हजार रुपये रोख शाल-श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले, तर याच मंचावर पुण्याचे डॉ. अरुण प्रभुणे यांना वारकरी संप्रदायातील अतुलनीय कार्याबद्दल पुरुषोत्तम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना ते म्हणाले की, धुंडिराज देगलूरकर, मधु मंगेश कर्णिक यांनी साहित्याच्या विश्वात मला विराजमान केले. तर स्वर्णलता भिशीकर यांनी तोडफोड हे ब्रिटिशांचे धोरण होते. मात्र, पूर्वापारपासून वारकरी संप्रदाय जोडण्याचे काम करत आहे. तेच काम देगलूरकर महाराज आणि प्रभुणे करत आहेत.

डॉ. फडणवीस म्हणाल्या, स्पर्धेच्या युगात माणूस परोपकार विसरत चालला आहे. केवळ वारकरी संप्रदाय हा विचार देतो. त्याचे जतन करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव कुसुरकर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...