आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्रू अनावर:डोळ्यासमोर सगळं जळत होतं अन् मी फायर एक्स्टिंगविश शोधत होतो

सोलापूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘माझ्या डोळ्यांसमोर माझ्या दुकानातील सर्व साहित्य जळत होते, काय करावे काही सुचत नव्हते. शेवटी फायर एक्स्टिंगविश सिलिंडरने आग विझवावी असे डोक्यात आले म्हणून मी दुकानाबाहेर पडलो. सिलिंडर आणेपर्यंत सर्व खाक झालं. शिल्लक राहिले फक्त माझ्या कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू...’ ही भावना होती व्ही. पवार सारीज दुकानाचे मालक संतोष पवार यांची. आसरा पुलाजवळ व्ही.पवार सारीज नावाचे दू मजली दुकान आहे.

रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ग्राहकांना शालू दाखवण्यासाठी सेल्सगर्ल वरच्या मजल्यावर गेले. त्यांच्यासोबत ग्राहकसुद्धा होते. वरच्या मजल्यावर गेल्यानंतर सेल्सगर्लने लाइट आणि एसीचे बटन लावले. लगेच एसीमधून स्पार्क झाला. ते पाहून सेल्सगर्ल पळत पळत खाली आली आणि मालकाला सांगितले. मालकही पळत वर गेले. किरकोळ प्रमाणात स्पार्क होत होते. ते बघून त्यांनी लगेच ती आग विझविण्यासाठी फायर एक्स्टिंगविश सिलिंडर आणण्यासाठी बाहेर पडले. ते आणेपर्यंत सर्वांची पळापळ झाली आणि वरचा मजला जाळून खाक झाला. तोपर्यंत एकाने अग्निशामन केंद्राला फोन करून माहिती दिली. लगेच दलाचे जवान आणि पाण्याचे बंब आले. आज विझविण्यासाठी दीड बंब पाणी लागले.

वरच्या मजल्यावरचे सर्व साहित्य आणि गोडाऊनमधील निम्मे कपडे जळून खाक झाले. वरची आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला. त्यामुळे खालच्या मजल्याचे सर्व कपडे ओले होऊन खराब झाल्याची माहिती पवार यांनी दिली. यावेळी त्यांचे कुटुंबीय सदस्याचे अश्रू अनावर झाले होते. शेजारील मंडळी त्यांना धीर देत होते.

बातम्या आणखी आहेत...