आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यापीठ परीक्षा स्थगित होऊन दोन दिवसांनी राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाला जाग आली आहे. सोमवार, दि. ६ फेब्रुवारीपासूनच्या पत्रिका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच पार पडतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठ यंत्रणा कामाला लागली आहे. शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या आदेशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा अंतिम वेळापत्रकानुसार घेतल्या जातील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.
२ ते ४ फेब्रुवारी दरम्यानच्या परीक्षा स्थगित झाल्या. आता शासनाच्या आदेशानुसार ६ फेब्रुवारीपासून विद्यापीठ संकेतस्थळावर जाहीर अंतिम वेळापत्रकानुसार ज्या-त्या दिवसाची परीक्षा सुरू करण्यात येत असल्याचे परिपत्रक परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणपूर यांनी काढले आहे. याची माहिती संबंधित सर्व महाविद्यालये, संस्था चालक व अधिविभाग प्रमुखांना कळवले आहे.
विद्यार्थ्यांना आवाहन संबंधित सर्व महाविद्यालये, विद्यापीठ संकुले व परीक्षा केंद्रप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी आवश्यक उपाययोजना करून परीक्षा विहित वेळेत पार पडतील, याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांनी आपल्या वेळापत्रकानुसार परीक्षा द्यावी, असे आवाहन परीक्षा मंडळ संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी केले आहे. २ ते ४ फेब्रुवारी दरम्यानच्या परीक्षा स्थगित आहेत. या परीक्षा नंतर होणार आहेत. विद्यापीठ संकेतस्थळावर सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, त्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना आवाहन
संबंधित सर्व महाविद्यालये, विद्यापीठ संकुले व परीक्षा केंद्रप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी आवश्यक उपाययोजना करून परीक्षा विहित वेळेत पार पडतील, याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांनी आपल्या वेळापत्रकानुसार परीक्षा द्यावी, असे आवाहन परीक्षा मंडळ संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी केले आहे. २ ते ४ फेब्रुवारी दरम्यानच्या परीक्षा स्थगित आहेत. या परीक्षा नंतर होणार आहेत. विद्यापीठ संकेतस्थळावर सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, त्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.