आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:फोमरा मूकबधिर विद्यालयात उत्तम प्रशिक्षण; ओम मोतीपावले यांचे प्रतिपादन

सोलापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ संचलित राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालय ही अलियावर जंग या नामांकित संस्थेच्या बरोबरीची शाळा आहे. उत्तम दर्जाचे शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण इथे दिले जाते. येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, गुणवत्ता,आणि निर्माण केलेल्या व्यावसायिक वस्तू या गोष्टी समाधानी आहेत, असे प्रतिपादन रोटरीचे प्रांतपाल ओम मोतीपावले यांनी केले. शाळेची माहिती मुख्याध्यापिका क्षितिजा गा‌‌‌‌‌‌‌‌‌ताडे‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ यांनी दिली. रोटरी नॉर्थचे अध्यक्ष डॉ. विजय देगावकर यांनी मोतीपावले यांचा सत्कार केला. यावेळी सोनी, बनकर यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. निहार बुरटे, राजगोपाल झंवर, पूनम देवदास, अर्जुन अष्टगी, डॉ. सिद्धेश्वर वाले उपस्थित होते. सूत्रसंचालन नागसेन माने यांनी केले तर आभार सचिव सुनील दावडा यांनी मानले.