आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:20 हजारांची लाच मागणारा राज्य‎ उत्पादन शुल्कचा जवान जाळ्यात‎

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दारूबंदी गुन्ह्यात जामिनाच्या अनुषंगाने‎ सहकार्याचा मोबदला म्हणून वीस हजार‎ रुपयांची लाच मागणारा राज्य उत्पादन शुल्क‎ भरारी पथकाचा जवान लाचलुचपत‎ प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला.‎ मलंग गुलाब तांबोळी (वय ३३, पद जवान‎ नेमणूक निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी‎ पथक, रा. स्वामी विवेकानंद नगर ओम गर्जना‎ चौक सैफुल) असे त्याचे नाव आहे.

विजापूर‎ नाका येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू‎ आहे.‎ जवान तांबोळी याने तीस हजार रुपये‎ लाचेची मागणी करून तडजोडीअंती वीस‎ हजार रुपये स्वीकारण्यास संमती दिली होती.‎ याची पडताळणी १४ ऑक्टोबर २०२२ रोजी‎ करण्यात आली. लाचलुचपत विभाग पुण्याचे‎ पोलिस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलिस‎ अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली‎ पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी‎ सापळा पथकाद्वारे कारवाई केली.‎

बातम्या आणखी आहेत...