आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाेलापूरच्या हातमागांवर प्रतिमा विणण्याच्या कलेचे सादरीकरण आता ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये हाेईल. १४ ते १८ नोव्हेंबर असे पाच दिवस ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनाचे आयाेजन करण्यात आले आहे. साेलापूरचे विणकर राजेंद्र अंकम यांना त्याचे निमंत्रण मिळाले. कला सादरीकरणासाठी त्यांनी छाेटासा हातमाग बनवला. त्यासह ते ऑस्ट्रेलियाकडे उड्डाण करतील.
ऑस्ट्रेलिया येथील प्रदर्शनासाठी केंद्रीय वस्त्राेद्याेग मंत्रालयाने देशातील पाच जणांची निवड केली. त्यात साेलापूरच्या अंकम यांचा समावेश आहे. ते हातमागावर निसर्गचित्रे, महापुरुषांच्या प्रतिमा विणतात. ही कला अतिशय अवघड आहे. हातमागावरील उभ्या-आडव्या धाग्यांतून विणत जाणाऱ्या कापडावरच प्रतिमा तयार करण्याची ही कला फक्त साेलापुरातच आहे. त्यासाठी अंकम यांना केंद्रीय वस्त्राेद्याेग मंत्रालयाने राष्ट्रीय पुरस्कार देऊन नुकताच सन्मान केला. त्यानंतर मेलबर्नच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे निमंत्रणही दिले. त्यांच्या प्रवास, मुक्काम आणि कला सादरीकरणावरचा सर्व खर्च वस्त्राेद्याेग मंत्रालय करणार आहे.
अंकम यांच्या कलेतून डाेनाल्ड ट्रम्प, पुतीनही... अंकम यांनी हातमागावर अनेक मान्यवर, महापुरुषांच्या प्रतिमा विणल्या आहेत. २०२० मध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प आले हाेते. त्यांच्या सन्मानार्थ अंकम यांनी विणलेली ट्रम्प यांची प्रतिमा भेट देण्यात आली. व्लादिमीर पुतीन यांची प्रतिमा साेलापुरातूनच रशियाला गेली. मुंबईत झालेल्या ‘मेक इन इंडिया’ प्रदर्शनात अंकम यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदींना त्यांची प्रतिमा भेट दिली.
कलेला प्रतिष्ठा मिळाली ^वस्त्राेद्याेगात आधुनिकता आली तरी हातमागावरील कला टिकून आहे. त्याचे श्रेय केंद्रीय हातमाग विकास आयुक्तालयाला दिले पाहिजे. त्यांनी देशातल्या विणकरांची नेहमीच काळजी घेतली. आंतरराष्ट्रीय स्तरावर कला सादरीकरणाची संधीही दिली. - राजेंद्र अंकम, विणकर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.