आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सोलापुरात टिपलेल्या वन्यजीव छायाचित्रांचे ‘जहाँगीर’मध्ये प्रदर्शन

सोलापूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील अस्थिरोगतज्ञ, वन्यजीव छायाचित्रकार डॉ. व्यंकटेश मेतन यांच्या ‘निसर्गाशी नाती जुळवा’ या प्रमुख संकल्पनेवर “वन्यजीव व लँडस्केप” छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबईच्या जहाँगीर आर्ट गॅलरी येथे भरवण्यात आले. बुधवारी (दि. २३) मान्यवरांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ झाला. २९ नोव्हेंबर प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये डॉ. मेतन यांच्या छायाचित्रांचे दुसऱ्यांदा प्रदर्शन भरले असून त्यामध्ये प्रामुख्याने सोलापुरात टिपलेल्या वन्यजीव छायाचित्रांचा समावेश आहे. तसेच, ‘सोलापूर पक्ष्यांचे नंदनवन’ हा संदेश या निमित्ताने देण्यात आले आहे. निसर्गाचे संवर्धन होण्यासह, प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्यांना सुंदर छायाचित्रांसह, त्यासंदर्भातली माहितीचा अनमोल खजिना प्रदर्शनाच्या निमित्ताने डॉ. मेतन यांनी खुला करून दिल्याच्या भावना, उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केल्या.

या प्रदर्शनात डॉ. मेतन यांनी टिपलेली ८४ छायाचित्रे प्रदर्शित केली आहेत. जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्याचा बहुमान डॉ. मेतन यांना दुसऱ्यांदा मिळाला आहे. या प्रदर्शनात सोलापुरातील वन्यजीवांची छायाचित्रे ठळकपणे मांडली आहेत. तसेच सोलापूर हे पक्ष्यांचे नंदनवन आहे हा संदेश देण्यात आला आहे.

या प्रदर्शनास फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडिया मुंबई शाखेचे वैभव जागुस्टे, माजी अध्यक्ष सुधीर धर्माधिकारी, युथ होस्टेल असोसिएशन महाराष्ट्र शाखेचे सचिव श्री. किणी, युनायटेड फोरम आॅफ फोटोग्राफर वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्रराज्य महासंघ सचिव सुनील कोरगावकर, महेश बनसोडे, सिद्धाराम सक्करगी, डॉ. सिद्धेश्वर वाले आदी उपस्थित होते.

डॉ. मेतन मागील मागील आठ वर्षे वाइल्ड लाइफ फोटोग्राफी करीत आहेत. निसर्गामधील अनेक आश्चर्यकारक घटना त्यांनी कॅमेऱ्यात टिपले आहेत. त्यांनी एशियन अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन (AAFT) नोएडा येथून फोटोग्राफीमध्ये डिप्लोमा पूर्ण केला आहे. ते सध्या नोएडा येथील प्रसिद्ध इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी (IIP) अकादमीमध्ये फाइन आर्ट फोटोग्राफीमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...