आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शेतकऱ्यांची अपेक्षा ; ८ तास वीज द्या, हमीभाव द्या, रस्ते माेकळे करा आणि पीककर्ज द्या

सोलापूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाणंद रस्ते, शेत रस्ते मोकळे करून द्या, शेतमालास योग्य हमी भाव द्या, दिवसा नियमित ८ तास वीज द्या आणि बँकांकडून कर्ज मिळवून द्या इतक्या माफक अपेक्षा शेतकऱ्यांनी एक दिवस बळीराजासाठी उपक्रमांतर्गत मांडल्या.

जिल्ह्यातील कृषी विभागांच्या अधिकाऱ्यांनी ८२ गावांना भेटी देऊन एक दिवस शेतकऱ्यांसोबत घालविला, त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यांचे प्रश्न समजून घेतले. यातून शेतकऱ्यांनी माफक अपेक्षा व्यक्त केल्या. अधिकाऱ्यांच्या भेटी डिसेंबरमध्ये या उपक्रमाचा अहवाल शासनाला सादर केला जाणार असल्याचे कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.

कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी टा. टेंभुर्णी, संगदरी, तेलंगवाडी, हिवरे, दडशिंगे, कारकल या ६ गावांना भेटी दिल्या. तर आत्माचे प्रकल्प संचालक यांनी ६, उपसंचालकांनी ५ तर कृषी उपसंचालकांनी २ गावांना भेटी दिल्या आहेत. उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी १७ तर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ४६ गावांना भेटी दिल्याचे कृषी अधीक्षक शिंदे यांनी सांगितले.अभियानात अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतात जाऊन कुटुंबियांशी संवाद साधला. त्या भागातील पीक परिस्थिती, पाऊस, पाण्याचे स्त्रोत, पीकांची रचना आदीबाबत माहिती घेतली.

अधिकारी दूरच...
एक दिवस बळीराजासाठी अभियानाची २२ ऑगस्ट रोजी घोषणा केली होती. १ ऑक्टोबर ते ३१ नोव्हेंबर या कालावधीत अभियाना राबविण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये राज्यस्तरापासून ते तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी सहभागी व्हायचे आहे. जिल्ह्यात कृषी विभाग वगळता जिल्हाधिकारी, सीईओ वा इतर अधिकाऱ्यांनी सहभाग नाेंदविलाच नाही.

बातम्या आणखी आहेत...