आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटनदिन उत्‍साहात:पर्यटनदिनी अनुभवली भुईकोट किल्ल्याची रचना अन् इतिहास‎

प्रतिनिधी8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर‎ दिंडी दरवाजा, हत्ती दरवाजा, शहर‎ दरवाजा, बुरुज, ३२ खांबी वास्तु,‎ मुंजा बाबा मंदिर, कपिलसिद्ध‎ मल्लिकार्जुन मंदिर, नागबावडी‎ विहीर, पद्मावती देवी मंदिर, खंदक,‎ तोफा, विरघळ यासह विविध‎ शिल्पांची माहिती घेतो सोलापूरकर‎ सरांनी भुईकोट किल्ल्याचा इतिहास‎ आणि रचना याविषयीची माहिती‎ जाणून घेतली आणि इतिहास‎ अनुभवला. इतिहास अभ्यासक‎ नितीन अणवेकर यांनी ही माहिती‎ दिली. निमित्त होते जागतिक पर्यटन‎ दिनाचे, पर्यटनप्रेमी सोलापूरकरांनी‎ मंगळवारी सोलापूरच्या भुईकोट‎ किल्ल्यात भ्रमंती करून इतिहास‎ जाणून घेण्यासाठी दिलेला प्रतिसाद‎ उल्लेखनीय होता.‎ इको फ्रेंडली क्लब, पर्यटन‎ विकास महामंडळ आणि महाराष्ट्र‎ पर्यटन संचालनालय यांच्या‎ मार्गदर्शनाखाली भुईकोट किल्ला‎ भ्रमंतीचा उपक्रम राबविण्यात‎ आला. दिंडी दरवाजा म्हणजे‎ काय हत्ती दरवाजा म्हणजे काय‎ शहर दरवाजा याचा अर्थ काय ?‎ बुरुज, ३२ खांबी वास्तु, मुंजा बाबा‎ मंदिर, कपिलसिद्ध मल्लिकार्जुन‎ मंदिर, नागबावडी विहीर, पद्मावती‎ देवी मंदिर, खंदक, तोफा, विरघळ‎ यासह विविध शिल्पांची माहिती‎ दिली. ही सगळी माहिती जाणून‎ घेऊन तरुणांनी आपल्या सोलापूरचा‎ हा उज्वल इतिहास जाणून घेतला.‎

सोलापुरात राहूनही भुईकोट किल्ल्याबद्दल फारशी‎ माहिती नव्हती. इतिहास अभ्यासक नितीन आणवेकर‎ यांनी भुईकोट किल्ला संदर्भात अभ्यासपूर्ण माहिती दिली.‎ प्रत्येक सोलापूरकरांनी एकदा तरी भुईकोट किल्ला‎ पाहिलाच पाहिजे . पर्यटन दिनानिमित्त छान संधी उपलब्ध‎ करून दिली. योगेश चडचणकर, पर्यटन प्रेमी‎