आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोके सरकार’ हा शब्द का झोंबला?:हे आधी स्पष्ट करा, आदित्य ठाकरेंचा सवाल, गद्दाराच्या घाणेरड्या राजकारणामुळे महाराष्ट्राची पिछेहाट

सोलापूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील गद्दारांना खोके सरकार शब्द एवढा का झोंबतो? खोके म्हणजे नक्की काय? खोके म्हणजे खोकेच, अशा शब्दात ठाकरे यांनी मुख्यमंत्रीसह शिंदे गटातील आमदारांवर बोचरी टीका केली. मानहाणीची नोटीस खुशाल पाठवा, पण खोके सरकार हे जगभर प्रसिद्ध झालेले आहे. राज्यातील 13 कोटी जनता व 33 देशांनी त्याची नोंद घेतली असून त्यांनाही नोटीस द्यावी असा घणाघात आदित्य ठाकरेंनी आज सांगोल्यात केला.

राज्यात अतिवृष्टीवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे मंगळवारी रात्री सोलापुरात आले. बुधवारी सकाळी ते पंढरपूर, सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर रवाना झाले. त्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला.

राक्षसी महत्त्वकांक्षा

आदित्य ठाकरे म्हणाले, एका व्यक्तीची राक्षसी महत्कांक्षा, गद्दारांचे घाणेरडे राजकारण राज्यात सुरु आहे. दुसरीकडे शेतकरी अतिवृष्टीमुळे त्रस्त, मोठे उद्योग राज्यातून बाहेर जात आहेत. बेरोजगार तरुण रस्त्यांवर फिरतोत, महिलांना शिवीगाळ होत असून महाराष्ट्र मागे चालला, घाणेरडे राजकारण करणाऱ्यांना ते करु द्यात, आम्ही जनतेची सेवा करण्यास प्राधान्य देतो.

गद्दारांचे घाणेरडे राजकारण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, मला अवमान याचिका नोटिस देण्यापूर्वी ‘खोके सरकार’ हा शब्द त्यांना नेमका का झोंबला आहे? हे त्यांनी अगोदर स्पष्ट करावे. राक्षसी गद्दाराच्या अन् गद्दारांचे घाणेरडे राजकारण त्यांचे आहे.

खोके सरकार म्हणाऱ्यांवर मानहाणीची नोटिस पाठविण्याचा इशारा राज्यातील शिंदे गटाने दिला आहे. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले,“खोके सरकार हे जगभर प्रसिद्ध झालेले आहे. राज्यातील 13 कोटी जनता व 33 देशांनी त्याची नोंद घेतली असून त्यांनाही नोटीस द्यावी. मला, नोटिस देण्यापूर्वी त्यांनी मला एक सांगावे, ‘खोके सरकार’ हा शब्द त्यांना नेमका का झोंबला आहे? मग, त्यांना उत्तर देऊ.

कृषी, उद्योगमंत्री गायब

अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना शेतावर बांधावर जाऊन भेटी देत आहोत. दोनदा अतिवृष्टी झाल्यानंतर मोठे नुकसान झालेले आहे. सरकार म्हणून पुढे कुणीही आलेले नाही. कृषिमंत्री गायब आहेत, त्याबाबत कोणालाही माहिती नाही. राज्यातून दोन महत्वाचे उद्योग निघून गेले असून उद्योग मंत्रीही काय करतात हेही कोणाला माहिती नाहीय. कृषी व उद्योग हे राज्याचे दोन्ही महत्वाचे घटक असून ते कोलमडताना दिसत आहेत, खोके सरकार त्याबाबत पुढे येताना दिसत नाहीय, अशी टिका ठाकरे यांनी केली.

भाजप समर्थकांनी शिवसेनेत केला प्रवेश

भाजप भारतीय दक्षिण आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष केंगनाळकर यांनी त्यांच्या समर्थकांसह बुधवारी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी अमर पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...