आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:मी राष्ट्रवादीतच...नाईलाजाने प्रवेश,‎ असे बोललोच नाही; अभिजित पाटील‎ यांचे स्पष्टीकरण

पंढरपूर‎ ‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी‎ ‎ काँग्रेसचे अध्यक्ष‎ ‎ शरद पवार यांच्या‎ ‎ उपस्थितीत मी‎ ‎ राष्ट्रवादी काँग्रेस‎ ‎ पक्षात प्रवेश केला‎ आहे. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस‎ पक्षाचेच काम जोमाने करणार आहे.‎ मी नाईलाजाने राष्ट्रवादी काँग्रेस‎ पक्षात प्रवेश केला, असे बोललोच‎ नव्हतो, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे‎ युवा नेते तथा श्री विठ्ठल सहकारी‎ साखर कारखान्याचे अध्यक्ष‎ अभिजित पाटील यानी नोंदवले.‎

रविवारी विठ्ठल कारखान्यावर‎ झालेल्या बायो सीएनजी प्रकल्पाच्या‎ भूमिपूजनानिमित्त झालेल्या शेतकरी‎ मेळाव्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.‎ शरद पवार यांच्या उपस्थितीत‎ कारखान्याचे अध्यक्ष अभिजित‎ पाटील यानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये‎ प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या‎ काही नेत्यांनी श्री पाटील याना प्रवेश‎ करण्यास भाग पाडले, अशा‎ स्वरूपाच्या बातम्या माध्यमांनी‎ प्रसारित केल्या.

त्या अनुषंगाने‎ बोलताना अभिजित पाटील म्हणाले,‎ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश‎ केल्यानंतर आपण जाहीरपणे‎ भाषणही केले आहे. राष्ट्रवादीचे‎ अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी‎ आपल्याला उमेदवारी देण्यासंदर्भात‎ सुद्धा सूचक वक्तव्य केले आहे.‎ यामुळे माझ्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये‎ उत्साह वाढला आहे. पुढील काळात‎ आपण मोठ्या नेटाने काम करून‎ राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला‎ मजबूत करू, असे त्यांनी सांगितले.‎