आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबार्शी (जि. सोलापूर तालुक्यातील पांगरी-शिराळे मार्गावरील फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला. ही घटना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास शिराळे पांगरीदरम्यान घडली. हा स्फोट मणियार यांच्या फटाक्यांच्या कारखान्यात झाला. या भीषण आगीत कारखान्याची राखरांगोळी झाली. या घटनेत कारखान्यातील एक महिला कर्मचारी ठार झाली, तर अनेक कामगार आत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
3 कामगार ठार, 3 गंभीर जखमी
सोलापूर बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी परिसरात फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन तीन कामगार जळून खाक झाले. यात तीन महिला गंभीर जखमी आहेत. कारखान्यात 20 कामगार काम करत असल्याची माहिती आहे. रुग्णवाहिका व अग्निशमन यंत्रणा दीड तासानंतर दाखल झाली.
वेळेत पोहचली नाही यंत्रणा
अग्निशमन यंत्रणा व रुग्णवाहिका वेळेत दाखल न झाल्याने जीवित हानी झाली असे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.पावणे पाच वाजेपर्यंत बार्शी नगरपालिकेची फक्त एकच अग्निशमन यंत्रणेची गाडी होती. साधारण एक किलोमीटर अंतरावरून पाणी आणून आग विझविण्यासाठी फेऱ्या मारत होती. पाच किलोमीटर अंतरावर पांगरी हे गाव असताना तब्बल दीड तास उशिराने ॲम्बुलन्स आली. त्यानंतर पावणे पाच वाजता पाच ॲम्बुलन्स आल्या.
नाशिकच्या जिंदाल कंपनीत बॉयलरचा स्फोट:2 महिलांचा मृत्यू, 14 जणांना रेस्क्यू ऑपरेशनद्वारे काढले
नवीन वर्ष स्वागताचे माहोल असतानाच नाशिक शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मुंढेगाव एमआयडीसीतील जिंदाल कंपनीत रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. बॉयलरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे समोर आले आहे. गेली 3 तास इथे स्फोट होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर मुख्यमंत्री आणि पालकमंत्री घटनास्थळी भेट देणार असल्याची शक्यता आहे.(येथे वाचा सविस्तर)
नाशिकपाठोपाठ बार्शीत दुर्घटना
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बार्शी तालुक्यात ही दुर्घटना घडली. याआधी सकाळी नाशिकमध्ये मोठा स्फोट झाला असून तेथील परिस्थिती अद्यापही चिंताजनक आहे. बार्शी तालुक्यात झालेल्या स्फोटात तीन जण ठार झाले आहेत तरीही या स्फोटात अनेक कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.