आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेटिंग लिस्टमधील मुलांचा विचार:आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी 6 जून पर्यंत मुदतवाढ

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरीता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतर्गंत प्रतिक्षा यादीतील प्रवेशाकरीता 6 जूनपर्यंत मुदत वाढ दिली आहे. तरी राज्यस्तरीय सनियंत्रण समितीच्या निर्णयानुसार प्रतिक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशाची निश्चिती करुन 8 जूनपर्यंत सर्व जिल्ह्यांनी झिरो रिमेंनिग करण्याची प्रक्रिया करण्यात यावी, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिली.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारानुसार 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु आहे. तरी पहिल्या निवड यादीनुसार मुलांचा प्रवेश दिला आहे. तरी आता वेटींग लिस्टमधील मुलांसाठी ऑनलाईन पध्दतीने एसएमएस पाठवण्यात आलेले आहेत. त्यानुसार प्रतिक्षा यादीतील बालकांच्या प्रवेश निश्चिती करीता दि. 19 मे ते 3 जूनपर्यंत मुदत होती. ती मुदत आता 6 जूनपर्यंत वाढवली आहे.

राज्यात एकुण 9086 शाळांची संख्या आहे. त्यामध्ये 1 लाख 1 हजार 906 एवढी प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी 2 लाख 82 हजार 783 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 1 लाख 12 हजार 560 अर्जाची निवड झाली होती. त्यापैकी 73 हजार 356 जणांचा प्रवेश निश्चित झाला आहे. ही स्थिती शनिवारी दि.4 जून दुपारपर्यंतची आहे.

वेटिंग लिस्टमधील मुलांचा विचार

आरटीई प्रवेशासाठी सोलापूर जिल्ह्यात 306 शाळा आहेत. त्यामध्ये पहिल्या निवड यादी 30 मार्चला निवड यादी प्रसिध्द करुन त्यामध्ये 1880 जणांची निवड झाली होती. 1375 जणांचे प्रवेश निश्चित झाले प्रत्यक्षात 490 जणांना शिक्षण विभागाकडून फोनद्वारे संपर्क करुनही त्यांनी प्रवेश घेण्यासाठी अप्रोच झालेले नाहीत. मात्र, आता वेटिंग लिस्टमधील मुलांचा विचार केला जात आहे. त्यानुसार प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी त्यांच्या लॉगीन मधून अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी. अलॉटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेवून विहित मुदतीत नजीकच्या पडताळणी केंद्रावर जावून पडताळणी समितीकडून तपासणी करुन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करायचा आहे, असे शिक्षण विभागाने कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...