आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक महिला दिनानिमित्त लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी व लायन्स क्लब सोलापूर रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ८ मार्चदरम्यान लायन्स अरुणोदय महिला सप्ताह सुरू आहे. यात पहिल्या दिवशी शंभर महिलांची नेत्र तपासणी करण्यात आली. कामिनी गांधी फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये महिलांसाठी फॅन्सी एम्ब्रॉयडरीचे मोफत कोर्स व शंभर महिलांची मोफत नेत्र तपासणी झाली. लायन्स नेत्रालयाचे महासिद्ध म्हमाणे व सुवर्णा काळे यांनी नेत्र तपासणी केली.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ट्विन सिटीचे अध्यक्ष लायन अभियंता सागर पुकाळे, रॉयलचे अध्यक्ष लायन डॉ. शिवाजी पाटील, उपविभागीय सभापती शैलेश कोरवार, सेवा सप्ताह प्रमुख नागेश बुगडे, इन्स्टिट्यूटच्या कामिनी गांधी, सुदर्शन गांधी, नंदिनी जाधव, ममता बुगडे, ऊर्मिला खेरोडकर, सुजाता कोरवार यांची प्रमुख उपस्थिती होती. इंद्रायणी कोल्हापुरे यांनी सूत्रसंचालन केले. दीपाली स्वामी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता लायन्स क्लबचे राजेश परसगोंड, राजीव देसाई, गणेश खेरुडकर, नितीन साळुंखे, कामिनी गांधी, मीनाक्षी, वैष्णवी झंपले, योगिता पाटील आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.