आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रासपकडून तीव्र निषेध:‘फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झालेत..’, आमदार सुभाष देशमुख यांच्या वक्तव्याने वादंग

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिलांची माफी मागावी, अन्यथा गुन्हा दाखल करूषेध

राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या महिलांसाठीच्या सवलतींचा संदर्भ देताना भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी सोमवारी वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झाले आहेत.’

सोलापुरात देशमुख म्हणाले, ‘अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात सर्वात जास्त महिलांवर लक्ष केंद्रित केले आहे. मुलगी जन्माला आल्यावर तिचे स्वागत केले आहे. मुलगी शिकायला गेल्यावरसुद्धा पैसे द्यायचे ठरवले. परत पाचवी-सहावीला गेल्यावर ५ ते ६ हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील. दहावीचे शिक्षण झाल्यावर मुलीला १८ वर्षांनंतर १५ किंवा १८ हजार रुपये मिळतील. मुलींची चिंता आता फडणवीस करणार आहेत. ते महिलांवर प्रचंड फिदा झालेत. महिलांच्या बचत गटासाठीदेखील त्यांनी मुंबईत मॉल सुरू केला आहे. महिलांच्या बचत गटातील मालाला मुंबईत मार्केट मिळावे म्हणून फडणवीस यांनी प्रयत्न केले आहेत.’

महिलांचा अपमान सहन करणार नाही : रासपचा इशारा
आमदार देशमुखांच्या या वक्तव्याचा राष्ट्रीय समाज पक्षाने निषेध केला आहे. देशमुखांनी महिलांची माफी मागावी, अशी मागणी शहराध्यक्ष सतीश बुजुरके यांनी केली आहे. महिलांचा अपमान सहन करणार नाही. या प्रकरणी त्यांनी माफी मागितली नाही तर गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा दिला आहे.