आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासनांची बरसात:समांतर जलवाहिनी आणि विमानसेवा सोलापूरकरांच्या मनासारखे होईल; हुतात्माला निधी - देवेंद्र फडणवीस

सोलापूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3 कार्यक्रमांमध्ये सोलापूरच्या विकासाला फडणवीसांचा ओके

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारच्या दौऱ्यांतील तीनही कार्यक्रमांत सोलापूरचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्याचे सूतोवाच केले. विमानसेवा आणि समांतर जलवाहिनी प्रश्नांची दखल घेतली. विमानसेवेच्या बाबतीत चिमणी प्रकरणी नोटीस दिल्याचे सांगितले.

समांतर जलवाहिनीचे काम १८ महिन्यांत पूर्ण होईल, त्यासाठीचे तफावतीचे ३४२ कोटी रुपये शासन उपलब्ध करेल, असेही म्हणाले. लवकरच सर्वकाही सोलापूरकरांच्या मनासारखे होईल, असे सांगत विमानसेवा व समांतर जलवाहिनी प्रश्न अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत दिले.शहराचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे रखडलेले काम सुरू होेणार आहे.

यातील कायदेशीर अडचणी दूर झाल्या आहेत. लवकरच काम पुन्हा सुरू होईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. महसूल भवन लोकार्पण, हुतात्मा स्मृती मंदिर येथील महानगरपालिकेचे कार्यक्रम आणि सायंकाळी हेरिटेज येथे झालेल्या भाजप मेळाव्यात फडणवीस यांनी विमानसेवा आणि समांतर जलवाहिनी या दोन्ही मुद्द्यांवर भर देत स्पष्टीकरण दिले. दरम्यान, विमानसेवेच्या बाबतीत विचार मंचचे केतन शहा यांनी विमानतळ येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले. माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी फडणवीस यांची भेट घेतली.

दरम्यान, विमानतळावर फडणवीसांचे स्वागत करण्यासाठी सर्व नेते बुके घेऊन आले होते, पण फडणवीसांनी प्रत्येकाकडून केवळ एक गुलाबाचे फूल स्वीकारले. महसूल भवन लोकार्पण प्रसंगी जिल्हाधिकारी मिलिंद शंंभरकर आणि स्मार्ट सिटी कामाच्या लोकार्पण प्रसंगी स्मार्ट सिटी सीईओ आणि पालिका आयुक्त शीतल तेली अनुपस्थित होते. दोन्ही कार्यक्रम प्रभारी अधिकाऱ्यांच्या उपस्थित झाले.

सोलापूरच्या उद्योगवाढीसाठी लवकरच उच्चस्तरीय बैठकमहापालिका आणि स्मार्ट सिटी निधीतील प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा गुरुवारी दुपारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे कळ दाबून फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी फडणवीस म्हणाले, साेलापूर अाैद्याेगिकनगरीत सध्या काही कमतरता आली आहे. ती दूर करून सुविधा पुरवू. उद्योग वाढीसाठी लवकरच एक उच्चस्तरीय बैठक घेऊ. स्मार्ट सिटीसह विविध याेजनांतील रस्ते निकृष्ट झाल्याच्या तक्रारींबाबत मनपा आयुक्तांनी पाहणी करावी. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करावी, असे आदेश दिले. हद्दवाढ विकासासाठी तिसऱ्या टप्प्यातील कामांचा प्रस्ताव आला असून त्याला मंजुरी देऊ.

शहराध्यक्ष देशमुखांचा विकासकामे झाल्याचा दावाआमदार देशमुखांनी वाचला मुख्य समस्यांचा पाढाप्रतिनिधी

सोलापुरात विविध योजनांमधून शहरासाठी जवळपास १९६ काेटी रुपये निधी दिला. त्यातून आजवर न झालेला विकास झाला, असा दावा करत माध्यमांचीच घुसमट हाेतेय असा दावा भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी केला. याच व्यासपीठावर त्यांच्यानंतर बाेलायला आलेल्या आमदार विजय देशमुख यांनी आयटी पार्क, शहरातील पाणीपुरवठा, गारमेंट उद्याेग अशा रखडलेल्या प्रश्नांचा पाढाच वाचला.भारतीय जनता पक्षाचा शहर व जिल्हा विजय संकल्प मेळावा गुरुवारी सायंकाळी द हेरिटेजच्या लाॅनवर पार पडला.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती हाेती. पालकमंत्री

सुभाष बापुंची व्यथा​​, ​​दलालांची कीड

साेलापूर जिल्ह्यात रेशन दुकानांत शिधा पुरवला जाताना मोदींचे नाव दुकानदार घेत नाहीत. ते दलाल आहेत. दलालांची कीड लागली आहे. ती दूर करण्याची जबाबदारी आपली आहे. आपण लोकांमध्ये जाऊन केलेले काम, दिलेले लाभ सांगितले पाहिजेत, असे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.

विजय देशमुखांची खंत : देवेंद्रजींची माया पातळ

मेळाव्यात विजय देशमुख काहीसे आक्रमक दिसले. ते म्हणाले, सीएम असताना तुम्ही दर तीन महिन्याला येत हाेता, पण आज माया पातळ झाल्यासारखी वाटतेय. पूर्वी मुंडे यांचे नेतृत्व होते. त्यानंतर तुम्हीच भाजप घडवण्याचे काम केले, त्यांना आपल्या मायेचा हात हवा आहे. येथील कार्यकर्ते काेणतीही निवडणूक येऊ दे विजयी करतीलच

.महसूल भवन, इंद्रभुवन, लक्ष्मी मंडई, स्टेडियम आणि प्रदर्शनी मैदानाचे लोकार्पणहुतात्मा स्मृती मंदिरात इंद्रभुवन व स्मार्ट सिटीतून झालेल्या कामांचे लाेकार्पण गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी महापालिका उपायुक्त संदीप कारंजे यांच्याकडून प्रकल्पांची माहिती घेताना उपमुख्यमंत्री फडणवीस. त्याचवेळी आमदार सुभाष देशमुख, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातही चर्चा चालू हाेती. यावेळी व्यासपीठावर आमदार राम सातपुते, खासदार रणजितसिंह निंबाळकर, खासदार महास्वामी, आमदार रणजितसिंह माेहिते पाटील आदी दिसत आहेत.