आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:सुमारे दोन लाख रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त

सोलापूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य उत्पादन शुल्क विभागाने उत्तर तालुक्यातील वडाळा व कळमण येथून सुमारे दोन लाख रुपयांचे बनावट विदेशी मद्य जप्त केले. वडाळा हद्दीत एका कारमध्ये (मारुती ८००, एमएच १२, बीवी ३६५९) गोवा राज्यात निर्मित विदेशी मद्याच्या बाटल्या आढळल्या.

वाहनचालक श्रीनिवास विठ्ठल वाघमारे यांच्याकडे चौकशी केली असता ओ चॉईस ब्रॅण्डच्या कागदी बॉक्समध्ये रिफीलिंग केलेल्या १८० मिली क्षमतेच्या मॅकडॉवेल नंबर वन व्हिस्कीच्या ४८ बाटल्या व रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या ४८ बाटल्या असा विदेशी मद्याचा साठा आढळला.

तसेच वाघमारे याच्या कळमण येथील घरातून ७५० मिली क्षमतेच्या ओ चॉईस ब्रॅण्ड विदेशी मद्याच्या १९१ बाटल्या, मॅकडॉवेल नंबर वन व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या १९२ बाटल्या, विविध ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या व बुचे जप्त केली. या कारवाईत वाहनाच्या दीड लाख किमतीसह एकूण तीन लाख ४८ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...