आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापासपोर्ट काढण्यासाठी २० वर्षांपूर्वी शाळेचा बनावट दाखला दिल्याबद्दल एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला वीस वर्षांनी ६ महिन्यांची शिक्षा न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी सुनावली आहे. नादनबी राजअहमद मुल्ला (वय ७०, रा. शास्त्री नगर) यांना शिक्षा झाली आहे. मुल्ला यांचे वय सध्या ७० आहे. त्यांना कोणाचाही आधार नाही. शिक्षा कमी करावी ही विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली. मानवतेच्या दृष्टिकोनातून व वयाचा विचार करून ६ महिने साधी शिक्षा व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. यात सरकारतर्फे अमर डोके यांनी बाजू मांडली तर आरोपीतर्फे आजमोद्दिन शेख यांनी काम पाहिले. कोर्टपैरवी म्हणून ज्योती बेटकर यांनी मदत केली.
चार साक्षीदारांचा जबाब अन् मुख्याध्यापकांची साक्ष झाली
१२ एप्रिल २००२ रोजी पासपोर्ट काढण्यासाठी पासपोर्ट कार्यालय पुणे येथे अर्ज सादर केला होता. या कागदपत्र छाननीसाठी पोलिस आयुक्त यांच्या कार्यालयाकडे अर्ज आल्यानंतर या कागदपत्रांसोबत मुल्ला यांनी उर्दू शाळा नंबर पाच येथील शाळेचा दाखला जोडला. तो खोटा असल्याचे समोर आले होते. पोलिस आयुक्तांच्या आदेशाने तत्कालीन साहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू जगताप यांनी ८ सप्टेंबर २००२ फिर्याद दाखल केली होती. सदर बझार पोलिसांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात चार साक्षीदारांचा जबाब नोंदवला. शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद शेख यांची साक्ष झाली. कागदपत्रांचा पुरावा ग्राह्य धरण्यात आला. न्यायालयाने सहा महिने शिक्षा सुनावली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.