आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभवानी पेठ घाेंगडे वस्तीत रासायनिक द्रव्यापासून बनावट ताडी तयार करणारी टाेळी पकडल्यानंतर त्याचे सूत्रधार पळून गेले हाेते. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने तेलंगण प्रांतातील सिद्धीपेठला जाऊन दाेन्ही सूत्रधारांच्या मुसक्याआवळल्या. साेलापूरच्या दारूबंदी न्यायालयासमाेर उभे केल्यानंतर त्यांना दाेन दिवसांची पाेलिस काेठडी मिळाली.
अंजय्या पापय्या पल्ली (वय 62) आणि श्रीधर यादगिरी मुत्तागिरी (वय 39, दोघेही राहणार सोलापूर) अशी या सूत्रधारांची नावेआहेत. 17 डिसेंबर 2022 राेजी टाकलेल्या छाप्यात हे दाेघेही घटनास्थळी हाेते. परंतु पथकाला चकमा देऊन पळ काढला हाेता. घटनास्थळावर एकूण 13 जण हाेते. पैकी 11 जणांना पथकाने ताब्यात घेतले. पसार असलेल्या दाेघांना पकडण्यासाठी जिल्हा अधीक्षक नितीन धार्मिक यांनी विशेष पथक तयार केले हाेते.
या पथकाला गुप्त खबर मिळाली की, हे दाेघेही तेलंगण प्रांतातील सिद्धीपेठेतआहेत. पथकाने लगेच सिद्धीपेठ गाठले. तिथल्या एका घरावर पाळत ठेवून दाेघांनाही ताब्यात घेतले. गुरुवारी त्यांना साेलापूरच्या दारूबंदी न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी नम्रता बिरादार यांच्यासमाेर उभे केले. न्यायालयाने दाेन दिवस पाेलिस काेठडीत ठेवण्याचाआदेश केला.
या धाडसी कारवाईत निरीक्षक संभाजी फडतरे, सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अंकुश अवताडे, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, महिला जवान प्रियांका कुटे व वाहनचालक रशीद शेख यांनी यांचा समावेश हाेता.
बनावट ताडी विकली कुठे?
भवानी पेठ घाेंगडे वस्तीतल्या बनावट ताडीनिर्मिती कारखान्याच्या कारवाईत घटनास्थळी 13 जण हाेते. पळून गेलेले पल्लीआणि मुत्तागिरी हेच सूत्रधार असल्याचे तपासात कळल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी विशेष पथक तयार केले. तेलंगण प्रांतातून दाेघांनाही ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना पाेलिस काेठडी दिली.
आता अधिक तपासात हे सूत्रधारच सांगू शकतील की, बनावट ताडी कुठे विकली? त्यांच्या जबाबातून ज्या शासनमान्य ताडी दुकानातून त्याची विक्री झाली, अशा दुकानांचे परवाने रद्द करण्यात येतील. संशयितांविराेधात नशेचे पदार्थ बाळगणे, दुसऱ्यांच्या जीवाला धाेका निर्माण करणे असे (कलम 328) गुन्हे दाखल केलेआहेत. - नितीन धार्मिक, जिल्हा अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.