आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्यातनाम तेलगू अभिनेते कृष्णम राजूंचे निधन:अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात होते केंद्रीय राज्यमंत्री, अभिनेता प्रभासचे काका

सोलापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलगू सिनेसृष्टीतल्या जुन्या काळातील ख्यातनाम अभिनेते कृष्णम राजू (वय 83) यांचे रविवारी सकाळी हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय राज्यमंत्री होते.

त्यांच्या मागे पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. 'बाहुबली' अभिनेता प्रभास यांचे ते काका होत. कृष्णम राजू यांचा पहिला सिनेमा 1966 मध्ये 'चिलका गोरिंका' का या नावाने प्रदर्शित झाला होता. त्यानंतर जवळपास त्यांनी 180 सिनेमा चित्रीत केले. अनेक चित्रपट गाजले. त्यांचा चाहतावर्ग सोलापुरात खूप मोठ्या प्रमाणात आहे. सोलापुरातील तेलगू भाषिकांमध्ये ते लोकप्रिय अभिनेते होते. त्यांच्या निधनाबद्दल सोलापूरच्या चाहत्यांनी दुःख व्यक्त केले.

केंद्रीय राज्यमंत्री होते

श्री राजू चित्रपटांपासून दूर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. दोन वेळा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी झाले होते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम केले होते.

कोरोना संसर्गाचा परिणाम

दोन वर्षांपूर्वी त्यांना कोविड संसाधने घेरले होते. हैदराबादच्या खाजगी इस्पितळात उपचार घेऊन ते घरी गेले. त्यानंतर पोस्ट कोविडने पुन्हा एकदा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर फुफ्फुसे आणि इतर अवयवांवर कोरोना संसर्गाचे परिणाम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

निमोनियामुळे मृत्यू ​​​

त्यामुळे त्यांना गेल्या काही दिवसापासून खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. चार दिवसांपूर्वीच हैदराबादच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडली. निमोनिया झाल्याचे निदान झाले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच रविवारी सकाळी मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.

या चित्रपटात केलेय काम

कृष्णम राजू यांचे अनेक चित्रपट सोलापुरात दीर्घकाळ टिकून होते. रंगा बिल्ला, सरदार बंदी, निप्पूतो चलगतम अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केली. डॅशिंग हिरो म्हणून त्यांची ख्याती होती. रिबेल स्टार या पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. अनेक फिल्मफेअर पुरस्कारही त्यांनी मिळवले होते. सदाबहार असा हिरो हरपल्याची भावना त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...