आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरीप हंगामात निर्माण होणारी युरिया खत टंचाई ध्यानात घेऊन नॅनो युरिया खताची निर्मिती करण्यात आली आहे. हे खत आता शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. युरियाच्या एका पोत्याच्या किमतीपेक्षा तब्बल १० टक्के कमी किमतीत नॅनो युरिया लिक्विड बाटली मिळत आहे. २४० रुपये किमत आहे. या संदर्भात कृषी विभागातर्फे जनजागृती सुरू आहे. पाण्यामध्ये मिसळून या खताची फवारणी करावी लागते. फवारणीच्या अतिरिक्त खर्चामुळे जिल्ह्यात त्यास संथ प्रतिसाद असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.
दरवर्षी खत, बियाणे टंचाई निर्माण होते. ही टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जातात. पण, अडचणींना समोरे जावे लागते. कृषी विभागाने खत टंचाई दूर करण्यासाठी नॅनो युरियाला प्रोत्साहन देण्याची तयारी सुरू केली आहे. यंदा नॅनो युरिया लिक्विड तयार केले आहे. याचा वापर केल्यास पिकांचे उत्पादन वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. एक पोते (गोणी) युरिया खत ऐवजी अर्धा लिटर नॅनो युरिया लिक्विड पुरेसे ठरणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.
कमी प्रमाण, आकार आणि मोठी क्षमता या दृष्टीने नॅनो युरिया लिक्विड तयार करण्यात आले असून त्याची अर्धा लिटरची एक बाटली सामान्य युरियाच्या एका गोणीच्या बरोबरीची आहे. याच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल. पोषण तत्त्वांच्या गुणवत्तेत सुधारणा होते.
जमिनीतील पाण्याच्या पातळीची गुणवत्ता सुधारणे, जलवायू परिवर्तन आणि टिकाऊ उत्पादनावर सकारात्मक परिणाम करून ग्लोबल वार्मिंग कमी करण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. जिल्ह्यात मागील वर्षी एक लाख १० हजार बाटलीचा पुरवठा झाला होता. यंदाच्या वर्षीसाठी तीन लाख बाटल्यांचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.