आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदाभाऊ खोतांची खोचक टीका:म्हणाले - शरद पवारांमध्ये कोणता पार्ट टाकलाय, वर गेल्या-गेल्या ब्रह्मदेवाला विचारणार

सांगलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बारामतीचा गडी इतका हुशार कसा? शरद पवारांमध्ये कोणता पार्ट टाकलाय, असा प्रश्न मी वर गेल्या - गेल्या ब्रह्मदेवाला विचारणार आहे, असा खोचक टोला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना लगावला आहे. तर मविआवरही त्यांनी जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले खोत?
सांगलीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विकासनिधीतून विविध विकास कामांचे शुभारंभ काल करण्यात आला. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण
दरेकर, माजी खासदार किरीट सोमय्या आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत हे उपसथित होते. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जोरदार हल्ला चढवला होता. सदाभाऊ म्हणाले की, बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवार यांच्यामध्ये नक्की कोणता पार्ट टाकला आहे? हे मी वर गेल्या-गेल्या ब्रह्मदेवाला विचारणार आहे, असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.

खोतांची पवारांवर टीका
नुकतीच ब्राह्मण समाजाच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी शरद पवारांनी ब्राह्मण संघटनेंकडून आरक्षणांची मागणी केल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले होते. मात्र त्यांना आरक्षणाचे नाही तर संरक्षणाचे निवेदन दिले होते, असे ब्राह्मण संघटनांनी म्हटले आहे. यावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे बारामतीचा गडी कसा आला, हे आपण मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहोत, मला वाटते की हा गडी ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला असेल, असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना लगावला आहे. तर इतका बिलंदर माणूस राजकारणात कधीही मिळणार नाही, असेही खोत यांनी म्हटले आहे.

मी पुन्हा येईनचा नारा
शेतकऱ्यांचा दुष्काळ हटवण्यासाठी, त्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यासाठी आणि बारा बलुतेदारांना न्याय देण्यासाठी मी पुन्हा येईन हे वाक्य खरे करायचे आहे. असे म्हणत त्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन केले आहे. लोक आपल्या वाक्याने आपली खिल्ली उडवत असतात, मात्र सर्वसामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी आपल्याला मी पुन्हा येईल हे वाक्य खरे करायचे आहे. असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी पुन्हा भाजपची सत्ता आणण्यायाठी प्रयत्नशील रहा असे कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...