आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी अपघात विमा योजना:सरकारी उदासीनतेमुळे जिल्ह्यातील 95 प्रस्ताव पडून, 6 महिन्यांपासून अंमलबजावणीच नाही

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवण्यासाठी राज्य सरकाराने 7 एप्रिल रोजी विमा कंपन्यांची निवड केली. त्याला सहा महिने उलटल्यानंतरही योजनेच्या अंमलबजावणीचा कालावधी निश्चित केला नाही. त्यामुळे अपघातात मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील 95 शेतकऱ्यांचे वारस आर्थिक मदती पासून वंचित आहेत.

राज्यभरातून किमान 700 प्रस्ताव कृषी विभागातच पडून आहेत. कृषी विभागासह विमा कंपनीच्या प्रतिनिधीनेही त्या प्रस्तावाच्या पडताळणीकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

शेती व्यवसाय करताना अपघातात अपंगत्व व मृत्यू झाल्यास त्या शेतकऱ्यांच्या वारसांना या योजनेतून भरपाई दिली जाते. मृत्यू झाल्यास दोन लाख, तर अपंगत्व आल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते. सर्व 7-12 धारक शेतकऱ्यांचा विमा हप्ता शासनामार्फत भरण्यात येतो. वीज पडपणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे अपघात, रस्त्यावरील अपघातात शेतकऱ्याला अपंगत्व तसेच मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना विमा कंपनीमार्फत आर्थिक मदत देण्यात येते.

या योजनेसाठी राज्य सरकाराने 7 एप्रिल 2022 रोजी चॉइस इन्शुरन्स व युनिव्हर्सल सोम्पो या विमा कंपन्यांची योजना राबवण्यासाठी शासन निर्णय घेऊन निवड केलेली आहे. पंरतु, या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी कालावधीच शासनाकडून निश्चित करण्यात आलेला नाही. 2021-2022 या वर्षांपासून 7 एप्रिल 2021 ते एप्रिल 2022 या अंमलबजावणी कालावधी निश्चित करण्यात आला होता. पण, 2022-23 साठी अद्याप कालावधी निश्चित झालेला नाही.

राज्य शासनाकडून सर्व सातबारा धारक शेतकऱ्यांचा विमा हप्ता विमा कंपन्यांना देण्यात येतो. कालावधी ठरल्यानुसार त्या कंपन्यांना प्रस्ताव प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी लागते. कालावधी निश्चित न केल्याने योजनेचा खंड कालावधी तयार होतो. त्या खंड कालावधीतील लाभ विमा कंपनी देत नाही. या काळातील लाभ राज्य सरकारला द्यावा लागू शकतो.

उत्तर सोलापूर 2, दक्षिण सोलापूर 5, अक्कलकोट 5,मोहोळ 7, बार्शी 6,माढा 5 ,करमाळा 18 (अपंगत्व दोन प्रस्ताव), पंढरपूर 9 ,मंगळवेढा 6 ,सांगोला 17 (अपंगत्व एक प्रस्ताव), 1 माळशिरस 12

बातम्या आणखी आहेत...