आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतून अपहरण केलेली फातिमाला सोलापुरात:दोन महिलांना हुसेन सागर एक्स्प्रेसमधून केली अटक

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतल्या जुहू विभागातून चार दिवसांपूर्वी अपहरण केलेल्या एक वर्षाच्या चिमुकल्या फातिमाला हैदराबादच्या हुसेनसागर एक्स्प्रेसने दोन महिला गुपचूप मुंबईला नेत होत्या.सोलापूर रेल्वे स्थानकात आल्यावर या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी व मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांनी या दोन महिलांना ताब्यात घेऊन दुरावलेल्या आईची आणि लेकीची भेट घडवून आणली आहे. यात महिला कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असून मुंबईच्या जुहू क्राईम ब्रँच आणि सोलापूरच्या रेल्वे पोलिसातील महिलांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.

याबाबतचे अधिक माहिती अशी की दिनांक 30 ऑक्टोबर रोजी जुहूच्या रस्त्यावरून एका मुलीचे अचानक अपहरण करण्यात आले. या मुलीचे वय एक वर्ष दीड महिना असे आहे. तिचे नाव फातिमा असून तिच्या आईचे नाव मुस्कान शेख असे आहे ही घटना घडल्यानंतर तिच्या आईने ताबडतोब जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवत संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासण्या सुरुवात केली. त्यानंतर एक महिला त्या बाळाला घेऊन लोकलमध्ये बसलेले, पायऱ्या उतरतानाचे सीसीटीव्ही फुटेज त्यांना पाहायला मिळाले.

त्या दोन महिलांचे संपूर्ण महाराष्ट्राच्या पोलीस समूहांमध्ये फोटो फिरवले आणि लांब पल्यांच्या दक्षिण भारतातील आरपीएफला देखील याची माहिती दिली. त्यानुसार सापळा रचून मुंबईतून जुहूचे क्राईम ब्रँच पथक आणि सोलापूरचे रेल्वे सुरक्षा बलाचे पथक अशी मोठ्या प्रमाणावर ही कारवाई करण्यात आली. याकरिता मुंबईहून प्राईम ब्रँचच्या जवळपास सहा सात सहकाऱ्यांना घेऊन सिद्धराम म्हेत्रे हे पोलीस निरीक्षक जुहू क्राईम ब्रँच अधिकारी हजर होते.

नातेवाईकांच्या मोबाईलवरून केले ट्रॅप

या महिलांच्या सीसीटीव्ही फुटेजवरून त्या कुठल्या आहेत काय आहेत याचा पत्ता लावला तर त्या मुंबई पार्लाच्या मिठीबाई कॉलेज श्रीलंका चाळ येथील राहणार निघाल्या. सुजेता पासवान (४२ ) आणि शरीफा (50). असे यांचे नाव आहे. या दोघीच्या नातेवाईकांचा पत्ता काढून त्यांच्या मोबाईलवरून या महिलांना संपर्क साधन त्या नातेवाईकांना बोलायला लावले आणि त्या लिंक वरून या महिलांचा सुगावा लावला आहे. दरम्यान या महिला ते बाळ विकण्यासाठी हैदराबादला गेल्या असाव्यात असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

याचे कार्य ठरले मोलाचे

निरीक्षक सतीश विधाते,अनुज पटेल, श्याम सिंह,नागनाथ मामुरे, महिला अधिकारी उर्वशी मनोज यादव शम्भू कुमार, अनिल गवली तथा अनिल धोटे हे रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी तर मुंबईचे ऑपरेशन “आहट ” पथकाचे सिद्धराम म्हेत्रे आणि त्यांचे अधिकारी सहकारी यांनी या प्रकरण सर्वात अधिक वेगाने काम केले.

बातम्या आणखी आहेत...