आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविजापूर रस्त्यावरील धर्मवीर संभाजी (कंबर) तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम महापालिका प्रशासनाच्या प्राधान्यक्रमावरुन पुन्हा जलपर्णीच्या विळख्यात रुतले आहे. जलपर्णी कायमची हटवण्यासाठी तलाव पाण्यात मिसळणाऱ्या ड्रेनेजच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची (एसटीपी) यंत्रणा कार्यान्वित करणे अपेक्षित होते. तसे न करताच मंजूर १२ कोटी १३ लाख निधीतून गाळ काढणे व जलपर्णी हटवण्यावर ८ कोटींहून अधिक निधी खर्ची घातल्याचे दिसत आहे.
चार वर्षे उलटल्यानंतर महापालिकेने कामासाठी २०२३ पर्यंत केंद्राकडून मुदत घेतली आहे. तरीही हा खर्च गाळात रुतण्याची शक्यता आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेंतर्गत संभाजी तलाव सौंदर्यीकरणाचा प्रकल्प मंजूर आहे. केंद्र सरकार, हुडको व महापालिकेचा हिस्सा या माध्यमातून निधी मंजूर करण्यासाठी २०१७ मध्येच प्रस्ताव तयार केला हाेता. केंद्र, राज्य व महापालिकेतही भाजपचीच सत्ता त्यामुळे तलाव परिसराचा कायापालट होण्याची आशा सोलापूरकरांना होती. पण प्रत्यक्षात ड्रेनेजचे पाणी थांबले ना जलपर्णी वाढणे रोखलेले नाही. आतापर्यंत झालेला कारभाराचा उलटा प्रवास सरळ करण्याचे काम सुरू झाले आहे.
जलपर्णी काढण्याच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली. त्यासाठी तामिळनाडू येथील सेफवे या कंपनीला मक्ता दिला गेला. हा मक्ता मूळ ३७ लाखांचा होता, तो कंपनीने २३ टक्के कमीने २९ लाखांत घेतला. त्यामुळेच काम बिघडले काय अशी शंका येते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.