आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, दुचाकी, 25 हजार रुपये पळविले

सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिक्षाचालकाच्या घरी चाकूचा धाक दाखवून चौघेजण सोन्याचे दागिने, २५ हजार रुपये व मोटारसायकल घेऊन पळून गेले. कोंडिबा बालाजी कनसाळे ( वय ३२, रा. गुरू राघवेंद्र नगर, मुळेगाव रोड, सोलापूर ) यांनी एमआयडीसी पोलिसात १४ जून रोजी फिर्याद दिली आहे. हा प्रकार पहाटे दोनच्या सुमाराला झाला आहे. वादीद बशीर शेख, सोहेल बाबू शेख, मुज्जा आणि अल्ताफ (या दोघांची पूर्ण नावे नाहीत) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वादीद आणि सोहेल या दोघांना सोमवारी अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवस पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक चौधरी यांनी दिली.

वीस हजार किमतीचे बोरमाळ, एक मोटारसायकल आणि पंचवीस हजार रुपये पळवून नेले आहेत. कनसाळे यांचे कुटुंबीय घरात झोपले होते. त्यांच्या आईला चाकूचा धाक दाखवून गळ्यातील बोरमाळ काढून घेतली, कपाटातून पैसे काढून घेतले. नंतर दुचाकी पळवून नेऊन पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक चौधरी यांना विचारले असता, कनसाळे आणि चारही संशयित आरोपी एकमेकांचे ओळखीचे आहेत. नेमके कशामुळे त्यांनी हा प्रकार केला आहे याचा अजून शोध सुरू आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...