आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री संत नामदेव आणि जनाबाई यांच्या ६७२ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त संत नामदेव विठ्ठल मंदिर बाळीवेस येथे धार्मिक कार्यक्रम झाले. युवती ध्वजपथकाने, तरुणांच्या वारकरी पथकाने व महिलांनी टाळ मृदंगासह भक्तिरसाचा आनंद दिला.
मंदिरापासून टिळक चौक, मधला मारुती पश्चिम मंगळवार पेठ आणि मंदिर या मार्गावरून पालखी, दिंडी काढण्यात आली होती. नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून या पालखी सोहळ्यात नामदेव शिंपी समाजातील सर्वांनी सहभाग नोंदविला होता. विशेषतः बाल वारकऱ्यांनी केलेल्या संतांच्या आणि विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषाचे सर्वांनीच कौतुक केले. युवतींनी ध्वज पथकाचे संचलन केले तर मुलांनी टाळ मृदंगावर ताल धरला. तर महिलांनी पालखी सोहळ्यातील पारंपरिक पाऊलखुणा हा भक्तिकला प्रकार सादर केला. या कार्यक्रमाच्या यशासाठी मुरलीधर रेळेकर, प्रकाश ढवळे, बाळकृष्ण राशिनकर, तुळशीदास पतंगे आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.