आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग:लाच घेताना कोषागार कार्यालयातील महिला लिपिक अटकेत

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फॅमिली पेन्शनची बिल वेळेत काढण्यासाठी सहा हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी दीड हजार रुपये अगोदर घेतले होते. उर्वरित साडेचार हजार रुपये लाच घेताना महिला लिपिक अश्विनी बडवणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. अश्विनी देविदास बडवणे वय ३४, रा. सैफुल विजापूर रोड ही महिला कोषागार कार्यालयामध्ये लेखा लिपिक म्हणून काम करत आहे. तक्रारदार यांच्या कुटुंबीयांना मिळणारी फॅमिली पेन्शनचे बिल वेळेत काढण्याकरिता बडवणे यांनी सहा हजार रुपये लाचेची मागणी केली. पहिला हप्ता म्हणून दीड हजार रुपये स्वीकारले. बुधवारी दुसरा हप्ता साडेचार हजार रुपयांचा घेण्यात आला. त्यांनी तक्रारदार यास बिल रजिस्टरमध्ये साडेचार हजार रुपये ठेवण्यास सांगितले. तक्रारदार यांनी ती रक्कम त्या ठिकाणी ठेवली. यानंतर ती रक्कम स्वीकारत असताना प्रतिबंधक कार्यालयाच्या वतीने बडवणे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी केली. मागील तीन दिवसांत लाचेची ही दुसरी घटना आहे.

बातम्या आणखी आहेत...