आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांवर दरसंकट:खते, कीटक-तणनाशकांच्या किमती गगनाला; कृषिमंत्र्यांचे बोट केंद्राकडे, तोंडावरच्या खरीप हंगामातील उत्पादनावर परिणाम

उत्तर सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रासायनिक खतांच्या दरवाढीचा भार असह्य असतानाच शेतकऱ्यांना आता कीटकनाशके व तणनाशकांच्या दरवाढीचे फटके बसणार आहेत. खरीप हंगाम तोंडावर आला असताना उत्पादकांनी रासायनिक औषधे व तणनाशकाच्या दरामध्ये जवळपास दुपटीने वाढ केली आहे. खते, औषधे, तणनाशके यांच्या या दरवाढीमुळे खरीप हंगामातील उत्पादन महागडे होणार आहे. यावर उपाय म्हणून कर कपातीचा मार्ग आहे. मात्र शेतकऱ्यांच्या नावाने राज्य करणाऱ्या आघाडीच्या मंत्र्यांनी याबाबत केंद्राकडे बोट दाखवले आहेत.

गेल्या वर्षभरापासून रासायनिक खताच्या किमतीमध्ये सतत वाढ सुरू आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर तुलनेने दुप्पट वाढ झाली आहे. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांची बी-बियाणे व पेरणीसाठी लागणाऱ्या खतांची जुळवाजुळव सुरू आहे. मात्र त्यांच्यासमोर आता दरदुपटीचे नवीन संकट उद्भवले आहे. खतांबरोबरच आता फवारणीसाठी लागणाऱ्या औषधांचे दर दुप्पट झाले आहेत, यात भर म्हणून तणनाशकाच्या किमतीही दुप्पट झाल्या आहेत. खरीप हंगामातील पिकांचा कालावधी हा कमी असतो. कमी कालावधीत शेतकऱ्यांना उत्पादन घ्यावे लागते. यामुळे खरीप पिकांना व खताची भर दिल्याशिवाय अपेक्षित उत्पादन मिळत नाही. यामुळे किमती कितीही वाढल्या तरी सध्या तरी रासायनिक खताला पर्याय नाही. यामुळे शेतकरी मिळेल त्या दरात खत खरेदी करत आहेत. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात कीड रोगांचा प्रादुर्भाव होतो. ही कीड नियंत्रित करण्यासाठी रासायनिक औषधांचा वापर केला जातो. सध्या बाजारात प्रचलित असणाऱ्या कीटकनाशकांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये शेतमजुरांची टंचाई असल्यामुळे शेतकरी नाईलाजाने तणनाशकाकडे वळला आहे. पावसाळ्यात तणांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. यामुळे खरीप हंगामात तणनाशकांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. वाढत्या दरवाढीमुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या दरवाढीचा परिणाम उत्पादनावर होणार असून खरीप उत्पादन महागडे होणार आहे. त्याला रास्त दर मिळाला तरच शेतीचे चक्र सुरू राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...