आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवचन‎:सिद्धारूढ मठामध्ये महोत्सव,‎ पट्टदेवरू महास्वामींचे प्रवचन‎

सोलापूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमद् जगद्गुरू सिद्धारुढ स्वामी‎ महाराज मठाच्या यात्रा महोत्सवाला‎ शुक्रवारी प्रारंभ झाला. अक्कलकोट‎ रोड एमआयडीसी विनायक नगर‎ येथील मठात विविध धार्मिक‎ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात‎ आले आहे. रोज सायंकाळी ७ ते १०‎ या वेळेत प्रवचन होणार आहे.‎ पहिल्या दिवशी मैंदर्गी येथील श्री‎ अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरू यांचे‎ श्री सिद्धारूढ महास्वामी आणि श्री‎ रेवणसिद्ध शिवशरण महास्वामी‎ यांच्या जीवन चरित्रावरील‎ अध्यात्मिक संगीत भजन आणि‎ प्रवचन झाले. प्रवचन ऐकण्यासाठी‎ मोठी गर्दी केली होती.‎

प्रारंभी श्री सद्गुरू चिक्करेवणसिद्ध शिवशरण महास्वामी यांच्या हस्ते‎ दीप्रज्वलन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक विनायक कोंड्याल,‎ गुरुशांत धूत्तरगावकर, उद्योजक प्रकाश जाधव, सिद्धाराम खजुरग्गी यांची‎ प्रमुख उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...