आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावी-बारावी च्या परीक्षेला पालक पाल्यांना ने-आण करण्यासाठी गर्दी करतात, मात्र हेच पालक रोजगार मेळाव्याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसतात. जिल्ह्यात बेरोजगार मुलं कमी कष्टाची नोकरी व जास्तीच्या पगाराची अपेक्षा करीत आहेत. त्यामुळे बेरोजगारांसाठी आयोजित केलेल्या मेळाव्यास म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. मागील वर्षभरात आयोजित केलेल्या मेळाव्यातून प्रत्यक्षात १८१३ जणांना रोजगार मिळाला आहे, प्रत्यक्षात किती जण उद्योगांमध्ये काम करीत आहेत हा संशोधनाचा विषय ठरेल. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून मागील वर्षभरात ऑफलाइन व ऑनलाइन पध्दतीने रोजगार मेळावे घेतलेत आहेत. उद्योजकता विभागाकडून मे २०२२ पासून आजपर्यंत १५ मेळावे घेण्यात आलेले आहेत. एकूण १५६ उद्योजकांनी सहभाग नोंदवला आहे. १५ हजार १९० एवढी रिक्त पदाची संख्या कळवल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात मेळाव्यास ४४२७ जणांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला. तर १८१३ जणांनी नोकरी मिळाली असल्याची माहिती उद्योजकता विभागाकडून मिळाली आहे.
रोजगाराची संधी वेळेत स्वीकारा
उद्योजकता विभागाकडून रोजगार मेळावे राबवण्यात येत आहेत. युवकांनी सहभाग नोंदवला पाहिजे. महिला उमेदवारांना येता येत नसेल तर पालकांनी पुढाकार घेवून त्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. सामाजिक भान ठेवून या रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. रोजगाराच्या संधी आहेत,त्या वेळेत स्विकारत्या पाहिजेत. मात्र युवक नोकरी मिळूनही जॉब स्विकारत नाहीत ही शोकांतिका आहे. परराज्यातून,तीन हजार किलोमीटरावरुन येवून युवक काम करीत आहेत, या गोष्टीची जाणवी आपल्या तरुणांनी राखली पाहिजे. अनुभव मिळेल तशी पगारात ही वाढ होत असते.भविष्यात चांगल्या हुद्याचे ही काम मिळू शकते.
११.९३ टक्के पात्र, उर्वरित प्रतीक्षेत
सोलापूर जिल्ह्यात एकूण आजपर्यंत १५६ उद्योगांकडून पंधरा हजार १९० पदे दाखवण्यात आली,त्यामध्ये आयटीआय पासून ते पदव्युत्तर शिक्षणातील जागा होत्या. त्यामध्ये फक्त ११.९३ टक्के जणांनी जॉब स्वीकारला आहे. उर्वरित सर्वजण आणखी नोकरीच्या शोधात आहेत. पाच वेळा ऑफलाइन तर १० वेळा ऑनलाइन पध्दतीने मेळावे घेतलेले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.