आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपच्या विरुध्द एक शब्दही बोलले तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो. नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर अपशब्द वापरल्याबद्दल का गुन्हे दाखल केला जात नाही, असा संतप्त सवाल शिवसेनेचे माजी नगरसवेक अमोल शिंदे यांनी उपस्थित केला. शर्मा आणि जिंदाल यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात बोलताना शिंदे म्हणाले, भाजप धार्मिक दंगली घडवण्याचे कारस्थान करीत आहे. त्याला बळी पडू नका. हिंदू-मुस्लिम दोघेही एकच आहेत, हीच आपली भारतीय संस्कृती आहे. लोकशाही मार्गाने, शांततेत लढा देऊ. तसेच मीडियाने सुध्दा समजुतीने काम करावे. उपस्थितांनी भाईचारा अबाधित ठेवण्याचे आवाहन केले. तसेच नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली.
यावेळी जमितय अहले हदीसचे मौलाना ताहेर बेग, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, राष्ट्रवादीचे राजू हुंडेकरी, तन्वीर गुलजार, दलित पॅँथरचे बंडू गवळी, प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी, जमीर शेख, प्रा. संजय जाधव, प्रा. जीवन यादव, विजय पोटफडे, हणमंत पवार, दत्ता पाटील, सौरभ भांड, महेश माने, निमिषा वाघमोडे, निर्मला शेळवणे, उमा गायकवाड, मोहित निकम, शेखर बंगाळे, युवराज पवार, रिजवान दंडोती, शफी रचभरे, मोहसीन शेख, बशीर कडपा, बशीर सय्यद, अमीर पठाण आदीसह अनेकजण उपस्थित होते. संयोजक मतीन बागवान यांनी आभार मानले. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.