आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील रस्त्यांची चाळणी झाली. पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही. चिखलामुळे रस्ते निसरडे बनले. त्याने दरराेज अपघात हाेतच आहेत. यंत्रणेच्या बेफिकिरीमुळे एका १३ वर्षीय मुलाचा जीव गेला. आणखी किती जीव घेणार? अशी विचारणा करणारे निवेदन आणि त्यावर दीड हजार लाेकांच्या सह्या प्रशासनासमाेर सादर करण्यात आले. जडवाहतूकविराेधी कृती समितीने जनांदाेलन उभारून अशाेक चाैक परिसरात सह्यांची माेहीम घेतली. त्याला लाेकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयीन विद्यार्थी, कारखानदार, कामगार, महिलांनी निद्रिस्त प्रशासनाला जागे करा, अशी हाक देत निवेदनावर सही केली. हे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना सादर करण्यात आले. तातडीने उपाय करावेत, अन्यथा हे आंदाेलन उग्र स्वरूप घेईल, असा इशाराच या वेळी देण्यात आला. सह्यांच्या माेहिमेत निरंजन बाेद्धूल, अरुण पुंजाल, नागेश सरगम, व्यंकी येमूल, अमर एक्कलदेवी, योगेश मार्गम, तुषार जक्का, अशोक सामल, व्यंकटेश पडाल, बालाजी दासरी, धनजंय मुदगुंडी, दत्ता पाटील, निर्मल सग्गम, नागार्जुन चिलवेरी, बालाजी विठ्ठलकर, उमाकांत श्रीकोंडा, आणासाहेब वाघमारे सहभागी हाेते.
एकदा तरी अधिकाऱ्यांनी फिरून पाहावे
१. बोरामणी नाका ते अशोक चौक पुढे गुरुनानक नगरचा रस्ता पूर्णपणे उखडून गेलेला आहे. अशाेक चाैक पाेलिस चाैकीजवळचा रस्ता पूर्णत: खड्ड्यातून जाताे. महाविद्यालयीन विद्यार्थी जीव मुठीत घेऊन सायकल चालवत आहेत.
२. विनायक नगर येथे खड्ड्यामुळे ट्राॅली उलटून एका तेरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तिथे महापालिकेने खड्डा खाेदून ठेवला हाेता. वेळीच बुजवला असता तर त्या मुलाचा जीव वाचला असता. त्याच्या मृत्यूनंतरही दखल घेतली नाही.
३. रविवार पेठ, साखर पेठ, भारतीय चाैक, शनिवार पेठ, बाराइमाम चाैक, विजापूर वेस येथील रस्तेही खड्डेमय बनले. श्रावणातील मिरवणुका याच रस्त्यावरून जातात. गणेशाेत्सव महिन्यावर येऊन ठेपलाय. रस्त्यांची दुरुस्ती कधी करणार?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.