आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपळाई रस्त्यावरील घटना,:महाविद्यालयीन युवकास फिल्मी स्टाइल मारहाण

बार्शी7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकीवर आलेल्या टोळक्याने महाविद्यालयीन युवकास अज्ञात कारणावरून फिल्मी स्टाइल मारहाण केली. यात युवकाचा हात मोडला. याप्रकरणी दोन अज्ञात युवकांवर बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील एका युवकाच्या दुचाकीचा नंबर एमएच १३ डीझेड ३२७७ असा आहे. सदर घटना १४ नोव्हेंबर रोजी उपळाई रस्त्यावर कृष्ण मंदिराजवळ सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली होती.

यातील जखमी युवक गणेश सुरेश राऊत (वय १७, रा. फुले प्लॉट, उपळाई रोड, बार्शी, मूळ फुरसुंगी, ता. हवेली) याने उपचारानंतर फिर्याद दिली आहे. फिर्यादी गणेश हा येथील सुलाखे उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीत शिकत आहे.

तो येथे आजीजवळ राहण्यास आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता तो उपळाई रस्त्यावरील दत्त चौकात शिकवणीकरिता गेला होता. परतत असताना लाल रंगाची दुचाकीवर एकजण व अन्य एका दुचाकीवर तीन जण आले. लाल रंगाच्या दुचाकीवरील मुलाने चालू दुचाकीवरून फिर्यादीच्या पोटात लाथ मारली. दुसऱ्या दुचाकीवरील तिघांपैकी एक अशा दोघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

बातम्या आणखी आहेत...