आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअक्कलकाेट रस्ता एमआयडीसीत स्वतंत्र अग्निशमन केंद्रासाठी अखेर जागा निश्चित झाली. पाण्याच्या टाक्यांजवळ साडेचार हजार चाैरस फूट जागेची पाहणी झाली. महापालिका आणि एमआयडीसीने संयुक्त पाहणी केली. त्याचा अहवाल आैद्याेगिक महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पुणे विभाग) यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. या आैद्याेगिक वसाहतीत सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडताना, तिथे स्वतंत्र अग्निश्यामक केंद्र नाही. सहा किलाेमीटर लांब असलेल्या रविवार पेठ येथून बंब सुटतात. त्या घटनास्थळी पाेहाेचेपर्यंत मालमत्तेचे प्रचंड नुकसान हाेते. आग नियंत्रणात आणणे कठीण हाेते. गेल्या महिनाभरात आगीच्या आठ घटना घडल्या. त्यात सुमारे ५० काेटी रुपयांचे नुकसान झाले.
आधुनिक यंत्रसामग्री देणार पालकमंत्र्यांनी दिली माहिती विखे-पाटील यांच्यासमाेर महापालिकेच्या अग्निशामक दलातील जुन्या वाहनांची माहिती दिली. आगीचे एकूण राैद्ररूप आणि ताेकडी यंत्रणा यामुळे कारखानदारांचे अधिक नुकसान हाेत असल्याचे गारमेंट उत्पादक प्रकाश पवार म्हणाले. त्यांचे म्हणणे पालकमंत्र्यांनी गांभीर्याने घेऊन नियाेजन समिती आधुनिक यंत्रसामग्री देईल, अशी घाेषणा केली.
अक्कलकाेट रस्ता एमआयडीसीत स्वतंत्र अग्निशमन केंद्र हाेणार मनपाने ठरवलेल्या जागेची संयुक्त पाहणी झाली. त्याचा अहवाल पाठवला. त्यावर निर्णय झाला, की पुढील कार्यवाही मनपा करेल. वसंुधरा जाधव, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी
पाण्याच्या टाकीजवळची साडेचार हजार चाैरस फूट जागा याेग्य आहे. तिथे बंब भरण्यासाठी पाण्याची कमतरताही राहणार नाही. तीच जागा निश्चित करण्यात आली. शीतल तेली, महापालिका प्रशासक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.