आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओबीसी आरक्षणाबाबत शासनाच्या निर्देशानुसार सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. अडनावावरुन अंदाज न घेता प्रत्यक्ष मतदारांच्या घरापर्यंत जाऊन सर्व्हे करावे. आताच्या स्थितीनुसार सर्व्हे केल्यास ओबीसीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे पालिकेने त्वरीत सर्व्हेक्षणांचे पध्दत बदलावे आणि योग्य सर्व्हे करावे अशी मागणी शहर भाजपाच्या वतीने पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे मंगळवारी करण्यात आले.
ओबीसीचे आरक्षण मिळवण्यासाठी इम्पेरिअर डाटा संकलन करण्यात येत आहे. त्याचे घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करण्याचे आदेश शासनाने दिले. पण बीएलआेकडून अडनाव किंवा एका ठिकाणी बसून सर्व्हे करण्यात येत आहे. अनेक अडनाव सर्व जातीमध्ये समावेश आहेत. त्यामुळे खरे ओबीसीची माहिती मिळणे कठीण आहे. प्रत्येक घरात जाऊन सर्व्हे करावे अशी मागणी शहर भाजपाच्या वतीने पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे करण्यात आले. याबाबत निवेदन दिले. यावेळी शहरध्यक्ष विक्रम देशमुख, सरचिटणीस शशीकांत थोरात, रुद्रेश बोरामणी, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र काळे, शहरध्यक्ष राम वाकसे, प्रशांत फत्तेपूरकर, अनिल कंदलगी, भुपती कमटम, नागेश वल्याळ, श्रीनिवास जोगी, आनंद कोलारकर, श्रीनिवास करली, श्रीनिवास पुरुड आदी उपस्थित होते.
सशंय असेल तर घरापर्यंत जावे लागेल
तीन जून रोजी बीएलओची बैठक घेऊन सर्व्हे करण्याचे काम सुरु केले. सशंय असलेल्या नावाबाबत खात्री करण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत जाऊन माहिती घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार काम सुरु आहे. पुन्हा याबाबत सूचना देऊन आणि खात्री करु, असे पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.