आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटाका दुर्घटना प्रकरण:आरोपीस 4 दिवस कोठडी

बार्शीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीवरील फटाका कारखान्याचा मालक युसूफ हाजू मणियार रा पांगरी यास पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बार्शी तालुक्यातील शिराळे हद्दीतील शेतजमीन गट न ४६९ मधील फटाका कारखान्याला आग लागून त्या आगीत भाजून गंभीर जखमी होवून चार महिला झाल्या, तर दोन जखमी झाल्या. याप्रकरणी विनापरवाना बेकायदेशीर फटाक्याचे गोडावून तयार करून त्यामध्ये स्फोटकांचा साठा करून तेथे काम करणाऱ्या मजूरांच्या सुरक्षेबाबत जाणीवपूर्वक हलगर्जीपणा केला. मजूरांच्या मृत्यूस व जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी फटाका कारखान्याचा मालक युसूफ हाजू मणियार व त्याचा भागीदार नाना पाटेकर यांच्याविरोधात पांगरी पोलिसांत सदोष मनुष्यवधासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...