आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यभरात सोमवारी एकाच वेळी पोलिस भरती प्रक्रिया सुरू होत आहे. त्यानुसार सोलापुरातही शहर, ग्रामीण आणि राज्य राखीव दलात भरतीसाठी मैदानी चाचणी होणार आहे. शहर पोलिस शिपाईपदाच्या १७१ जागा तर वाहनचालकाच्या ७३ जागा आहेत. एकूण १३ हजाराच्या आसपास ऑनलाइन अर्ज आले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये ६०० उमेदवारांना चाचणीसाठी बोलावले आहे. शहरासाठी चाचणी पोलिस मुख्यालयाच्या मैदानात होणार आहे. पहाटे पाचपासून चाचणी सुरू होणार आहे. प्रत्येक उमेदवारांचे गोळा फेक, १०० व १६०० मीटर धावणे अशी मैदानी चाचणी आहे. यासाठी इलेक्ट्रिक मशिन बसवण्यात आले आहे. म्हणजे प्रत्येक उमेदवाराचे वेळ, गुण मशिनद्वारे मोजण्यात येणार आहेत.
भरती प्रक्रियासाठी २२० कर्मचारी आणि पन्नास अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यात पोलिस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, पोलीस निरीक्षक, फौजदार दर्जाचे अधिकारी पथकात असतील.
१३८५ महिलांचे अर्ज सहायक पोलिस आयुक्त दीपक आर्वे म्हणाले की, उमेदवारांची कागदपत्र तपासणी झाल्यानंतर मैदानी चाचणी होईल. दररोज ६०० ते ९०० याप्रमाणे उमेदवार बोलावण्यात येणार आहेत. साधारण १३ हजाराच्या आसपास उमेदवारांचे अर्ज आहेत. चालकपदासाठी ७३ जागा असून त्यात २५२ महिलांनी अर्ज केले आहेत. पोलिस शिपाईसाठी १३८५ महिला उमेदवार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.