आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडांना ठिबकने पाणीपुरवठा, शेतकऱ्याला अटक:पंढरपुरात 16 लाख रुपयांची गांजाची पाचशे झाडे जप्त

पंढरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवते (ता. पंढरपूर) येथे एका शेतकऱ्याने चक्क अडीच ते तीन गुंठे जागेमध्ये गांजाची शेती केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे या गांजा शेतीला ठिबक सिंचनने पाणी पुरवठा केला जात होता. दरम्यान, याची कुणकुण लागताच करकंब पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. पोलिसांनी या कारवाईमध्ये पाचशेहून अधिक गांजाची झाडे तर जवळपास ११७ किलो वजनाची झाडे असा १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संतोष चंद्रशेखर पुरी असे शेतकऱ्याचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेवते गावाच्या शिवारात गट नंबर २५० /१ मध्ये संतोष चंद्रशेखर पुरी याने गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर करकंब पोलिसांनी छापा टाकला. शेतकरी संतोष पुरी यांनी त्याच्या शेतामध्ये अडीच गुंठा जागेत गांजाची लागवड केल्याचे दिसून आले. तसेच या झाडांना ठिबकने पाणीपुरवठा केला जात होता. पोलिसांनी झाडे आणि सर्व साहित्य जप्त केले आहे. तसेच आरोपी शेतकरी संतोष पुरी यास ताब्यात घेऊन अटक केली आहे.