आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:ऊस वाहतूक करताना नियमांचे पालन करा

दक्षिण सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या साखर कारखाने सुरू झाल्याने ट्रक व ट्रॅक्टरमधून उसाची वाहतूक होत आहे. ऊस वाहतूक करताना अपघात होऊ नये. यासाठी वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन मंद्रूपचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी केले.भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखान्यातील वाहन चालकांची बैठक घेतली.या वेळी लोकमंगलचे संचालक पराग पाटील, सुरक्षा विभागाचे प्रमुख, ऊसपुरवठा अधिकारी, ऊस विकास अधिकारी व ट्रॅक्टर तसेच ट्रक चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मांजरे म्हणाले ट्रॅक्टर ट्रेलरला रेडियम पट्टी व रिफ्लेक्टर बोर्ड बसवावे.

वाहनांवर नंबर असावा. चालत्या वाहनात टेप लावू नये. वाहने उतारावरून जाताना काळजी घ्यावी. वाहने उतारावर, वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने लावू नयेत. ऊस भरण्यासाठी वापरलेल्या दांड्या चांगल्या असाव्यात. दारू पिऊन ट्रॅक्टर चालवू नये. वळणांवरून जाताना अंदाज घेऊन वाहने चालवावीत. तीन चार मोकळे ट्रेलर्स जोडू नये. अन्यथा या नियमांचे पालन न केल्यास संबंधित चालकाविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...