आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बीकेसी'वर कार्यकर्त्यांची शाही बडदास्त:शिंदे गटाच्या मेळाव्याला बसल्या जागी खा बटाटवडे आणि मसाला राइस

मनोज व्हटकर| मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांच्या पोट पूजेसाठी बीकेसी मैदानावर जवळपास दोन लाख पाण्याच्या बाटल्या आणि तेवढ्यात लोकांसाठी बटाटेवडे, मसाला राईसची सोय करण्यात आली आहे.

बीकेसी मैदानाच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला भव्य शामियानामध्ये बटाटा वडा, मसाला राईस बनविण्याचे काम सुरू आहे. तिथूनच शिवसैनिकांना तसेच मेळाव्यासाठी आलेल्या सर्वांनाच हे बटाटेवडे मसाला राईस आणि पाण्याच्या बॉटल्स दिल्या जात आहेत. त्याशिवाय जे शिवसैनिक या मैदानात दाखल झाले आहे आणि जे सकाळी, पहाटे या मैदानात उतरलेले आहेत त्या सर्वांची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे.

रात्रीपासूनच हे पदार्थ बनविण्याची तयारी झाली आहे. आज सकाळपासून नाश्त्यापासून ते दुपारचे जेवणापर्यंत येथे जमलेल्यांनी बटाटा वडा आणि मसाला राईस आस्वाद घेतला. सायंकाळी मेळावा सुरू झाल्यानंतर बसलेल्या शिवसैनिकांना तसेच व्हीआयपीमध्ये लोकांना जागेवर हे बटाटेवाडी पोहोच केले जाणार असल्याची माहिती येथील सूत्राने दिली.

बातम्या आणखी आहेत...