आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरीरातील न दुखणाऱ्या गाठींकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतल्यास उद्भवणारे कर्करोग वेळेत आटोक्यात आणू शकतो. म्हणून ९ वर्ष ते १६ वर्षे वयाच्या किशोरवयीन मुलींनी एच.पी.व्ही. चे लसीकरण करून घेतल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो असे प्रतिपादन प्रख्यात पॅथॉलॉजिस्ट डॉ. राजीव प्रधान यांनी केले.ते फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्या नरोत्तम सेकसरिया फाउंडेशन प्रकल्पांतर्गत सेवासदन कन्या प्रशालेमध्ये जागतिक कर्करोग दिनानिमित्त आयोजित प्रबोधन शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवा सदन संस्थेच्या चिटणीस वीणा पतकी या होत्या.
यावेळी व्यासपीठावर फॅमिली प्लॅनिंगचे कोषाध्यक्ष डॉ. एन. बी. तेली, शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड, लता पोटफोडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी, स्वाती पोतदार आदी उपस्थित होते. वीणा पतकी यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रास्ताविक सुगतरत्न गायकवाड यांनी केले. सुत्रसंचालन स्वाती पोतदार यांनी केले तर आभार सतीश कुलकर्णी यांनी मानले. मनीषा चव्हाण, सुरेखा डबरे, करण खानापुरे आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.