आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:30 वर्षांत प्रथमच 12 वेळेस पारा 44 अंशापुढे; 2005 ला 45 अंशापेक्षा जास्त ; 9 मेला सर्वाधिक तापमान

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळा अन् ‘तीव्र उन्हाळा’ हे दोनच ऋतू सोलापूरमध्ये असतात, असा अनेकदा गमतीने उल्लेख होतो. मागील ३० वर्षांतील मे महिन्यातील तापमानाचा आकडेवारीच्या तुलनेत तब्बल १२ वेळा पारा ४४ अंशाच्या पुढे गेला आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद ९ मे रोजी झाली होती. मार्च, एप्रिल महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता जास्त असते. मे महिन्यात अवकाळी पावसाला सुरुवात होते अन् तापमान घटते, अशी धारणा असते. पण मे महिन्यातही पारा ४४ अंशाच्या पुढेच असल्याचे हवामान विभागातील नोंदीद्वारे दिसून येते. देशभरातील तापमानाच्या तुलनेत मे महिन्यात महाराष्ट्रात कमाल तापमान सामान्य, असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून ३० एप्रिल रोजी वर्तवण्यात आला होता. पण हवामान विभागाचे सर्व अंदाज फोल ठरवत प्रत्यक्षात मे महिन्यात मान्सूनमधील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. यंदाच्या वर्षी उकाड्याने सोलापूरकर फारच हैराण झाले. अवकाळी पाऊस अन् त्यानंतरचे चार-दोन दिवस वगळता यंदाचा मे कडाक्याच्या उन्हाचा सोलापूरकरांसाठी गेला.

बातम्या आणखी आहेत...