आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सक्लुझिव्ह:प्रथमच 3 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या पालकांसाठी अभ्यासक्रम येणार, मातृभाषेवर देणार भर, आई-वडिलांसाठी गाइडलाइन

नवी दिल्ली अनिरुद्ध शर्मा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात प्रथमच ३ वर्षांपर्यंच्या मुलांच्या आई-वडिलांसाठी अभ्यासक्रम तयार होत आहे. याच्या माध्यमातून आई-वडिलांना शाळेत पाठवण्याआधी मुलांचा मेंदू वेगाने विकसित व्हाव यासाठी घरी पालन पोषण कसे करावे याची शिकवण दिली जाईल. मुलांशी केवळ मातृभाषेत बोलले जावे यावर भर दिला जाईल. कारण, सुरुवातीच्या वयात मुले ऐकून सर्वात जास्त शिकतात. यामध्येही मातृभाषेत सर्वात जास्त वेगाने शिकतात. शिकण्यामुळे मेंदूचा विकास जास्त वेगाने होतो. हा विकास पुढे जाऊन कौशल्य शिक्षण आणि क्षमता वाढवण्यात मदत करते. आई-वडिलांना सांगितले जाईल की, घरात कार्टुन लावले जात असेल तर मातृभाषेतच असावे. स्थानिक नाव घेता येतील अशीच खेळ, खेळणी असावेत. आवाजातून शिकण्याची समज वाढते त्यामुळे आईने मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी सांगाव्यात. केंद्रीय शिक्षण सचिव अनिता करवाल यांनी सांगितले की, देशात आतापर्यंत जेवढ्या वेळेस अभ्यासक्रम तयार झाला त्यात मुलांच्या शिक्षणावर भर असायचा. नव्या धोरणात आई-वडिलांचाही अभ्यासक्रम असेल. यात आई-वडिलांसाठी योग्य वागणुकीचे मार्गदर्शकतत्त्व असतील. बदल आवश्यक, कारण मेंदूचा ९०% विकास सुरुवातीच्या वर्षांमध्ये होत असतो

मेंदूचा ९०% विकास सुरुवातीच्या वर्षांत होतो हे जगभरातील अनेक संशोधनांनी सिद्ध केले आहे. ३ वर्षे वयापर्यंत मेंदूत न्यूरॉन (मज्जातंतू पेशी) आणि सिनेप्सेस (मज्जातंतूशी कनेक्शन) १० लाख प्रति सेकंद वेगाने विकसित होते. सिनेप्सेसची संख्या सुमारे १० खर्वपर्यंत(१००० ट्रिलियन) असते. यानंतर किशोरावस्थेत मेंदूत सिनेप्सेसची संख्या घटून निम्मी राहते. सिनेस्पेसच्या छटाईनंतर मेंदूच्या विकासात अनुभव आणि वातावरणाची महत्त्वाची भूमिका असते. सिनेप्सेस आणि न्यूरॉनचे जेवढे उत्तेजन होते ते तेवढे जास्त विकसित होतात. म्हणजे, ३ वर्षांत सकारात्मक अनुभवांमुळे मेंदूचा सर्वात चांगला विकास होतो. यामुळे त्यात कौशल्य आणि क्षमतांचा पाया रचला जातो.त्यामुळे उच्च कौशल्यासाठी ते गरजेचे ठरते.

बातम्या आणखी आहेत...