आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाढ्याच्या सबजेल मध्ये असलेले चार सराईत आरोपी पळुन गेले.सोमवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. सबजेल मध्ये एका आरोपीस झटका आल्याचा बनाव केला गेला.त्या आरोपीस बाहेर काढत असताना इतर आरोपीनी पोलिसांशी झटापट केली आणि या झटापटीत चौघांनी चक्क सबजेलमधुन धुम ठोकली. एखाद्या चित्रपटात घडावा असा साजेशी ही घटना माढा सबजेल मध्ये घडली.
दरम्यान या घटनेमुळे सबजेलमध्ये ड्युटीवर असलेले पोलिस एखाद्या आरोपीला बाहेर काढताना किती दक्ष असतात.याचीच प्रचिती या घटनेतुन समोर आली.
सिद्धेश्वर कैचै(बनावट नोटा बनवणे बनवणे),अकबर सिद्दाप्ना पवार(बेकायदेशीर हत्यार जवळ ठेवणे), आकाश उर्फ अक्षय राॅकी भालकर(खुनाचा गुन्हा,तानाजी लोकरे(पाॅस्को) अशी पळुन गेलेल्या चौघा गुन्हेगाराची नावे आहेत.
अकबर पवार यास झटका आल्याचे आरोपीने ड्युटीवर असलेल्या पोलिसांना सांगितले. पोलिस देखील त्या अकबर पवारला बाहेर काढण्यासाठी जेलचे दार उघडताच चौघांनी बेत आखल्या प्रमाणे धुम ठोकली. टेभुर्णी २,कुर्डूवाडी २ या पोलिस स्टेशन च्या गुन्ह्यातील हे आरोपी आहेत.
आरोपी पळुन जाताच माढ्यात झटापटीत नाकाबंदी करण्यात आलि मात्र आरोपी पळुन जाण्यात यशस्वी ठरले. वरिष्ट पोलिस अधिकार्यानी याबाबत पथके तैनात केली असुन चोघा आरोपीचा कसुन शोध घेतला जातोय. आरोपींना पकडडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.
द्धेश्वर कैचै सराईत गुन्हेगार दुसर्यादा पळाला-
मोडनिंबच्या जनावरांच्या बाजारात बनावट नोटा देऊन शेळ्या खरेदी करण्याच्या प्रकरणात टेभुर्णी पोलिसांच्या बनावट चलनी नोटा च्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहै.या अगोदर देखील सिद्धेश्वर कैचै हा बार्शी ग्रामीण रुग्णालयातुन वैराग पोलिसांच्या ताब्यातुन पळुन गेला होता.त्यास वैराग पोलिसांनी शिताफीने पकडले होते. आताही तो दुसर्या वेळेस पळुन जाण्यात यशस्वी ठरला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.