आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा पंचवीस हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी टाकळी सिकंदरचा तत्कालीन ग्रामविकास अधिकारी गोपीचंद दादा गवळी, तत्कालीन सरपंच नवनाथ तुळशीदास अनुसे (टाकळी सिकंदर, ता. माेहाेळ) यांना दहा वर्ष सक्तमजुरी व चार हजार रुपये दंड झाला. तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचारी महंमद कचरोद्दीन पठाण यास पाच वर्षाची सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीक्ष आर. एन. पांढरे यांनी ठोठावली. मंजूर घरकुलाचा दुसरा व तिसरा हप्ता लाभार्थीस देण्यासाठी मोहोळ पंचायत समितीला अहवाल पाठविण्यासाठी तक्रारदाराकडून संबंधित आरोपींनी लाच मागितली होती.
२०१२ मध्ये लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार सापळा रचून लाच स्वीकारताना सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले होते. मोहोळ पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल होता.
या खटल्यात सरकारतर्फे अॅड. ए. जी. कुलकर्णी तर आरोपीतर्फे अॅड. राहुल खंडाळ, अॅड. नीलेश जोशी, अॅड. व्ही. पी. शिंदे यांनी काम पाहिले. लाचलुचपत विभागातर्फे पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कोळी, कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून सहाय्यक फौजदार सायबण्णा कोळी, हेड कॉन्स्टेबल बाणेवाले व पोलीस नाईक घुगे यांनी काम पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.