आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा सिद्ध:लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला पळवणाऱ्या तिघांना सक्तमजुरी

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सैफुल परिसरातून एका अल्पवयीन मुलीस कारमधून लिफ्ट देण्याच्या बहाणा करून तिला पळवून नेत विनयभंग केल्याप्रकरणी तिघांना तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्रन्यायाधीश व्ही. पी. आव्हाड यांनी सुनावली. महादेव मल्लेशा बिराजदार (वय ३०), राजशेखर पुंडलिक कोकरे (वय २६), रमेश मल्लेशा बिराजदार (वय ३८, सर्व रा. तेलगाव, ता. उत्तर सोलापूर) यांना शिक्षा झालेली आहे. पीडित मुलीने विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली होती. हा प्रकार ३ फेब्रुवारी २०१७ रोजी घडला होता. ती मुलगी, सैफुल (विजापूर रस्ता) येथील बसस्थानकावर थांबली होती. येथून महादेव व रमेश यांनी कारमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने सोबत घेतले. तिला मंद्रूप रस्त्यावर नेण्यात आले.

त्यानंतर मुलीने मला कोठे नेत आहात, असे विचारताच सीटखाली लपवले. नंतर चडचण येथे घेऊन गेले. तिथे रमेश गाडीतून उतरला. तर, त्यानंतर महादेव याने राजशेखरला बोलावून घेतले. धमकी देऊन मुचंडी (जत) येथे नेले. एका ठिकाणी तिचा विनयभंग केला. रस्त्याच्या बाजूला कार बंद पडली. एका ठिकाणी कार बंद पडल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना कारबाबत संशय वाटल्यामुळे पोलिसांना माहिती दिली. स्थानिक पोलिसांनी चौकशी केल्यानंतर विजापूर नाका पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संजीव भोसले यांनी तपास केला होता. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. ७ साक्षीदार तपासले. लैंगिक अत्याचार करण्याच्या हेतूने तिला पळवून नेऊन विनयभंगाचा प्रयत्न केल्याचे तक्रार दिली होती. हा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे तिघांना शिक्षा झाली आहे. यात महादेव याला विनयभंग केल्याप्रकरणी दोघांसह पळवून नेल्याप्रकरणी शिक्षा झाली आहे. सहा हजार रुपये दंड पीडित मुलीला देण्याचे आदेश आहेत. यात सरकारतर्फे शीतल डोके, आरोपीतर्फे व्ही. डी. फताटे या वकिलांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...